पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये शिरगाव मध्ये निरबावी नावाचे पांडवकालीन कुंड आहे. या कुंडामध्ये नीरा नदीचा उगम होतो. ही नदी भीमा नदीची उपनदी असून पुणे सातारा व सोलापूर जिल्ह्याम मधून वाहते. कृष्णा नदी नंतर दुसऱ्या क्रमांकावर नीरा नदीला देवत्व प्राप्त झाले. पालखी सोहळ्या दरम्यान ज्ञानोबांच्या पादुकांना नीरा नदीच्या पाण्याने स्नान घातले जाते . निरा नरसिंहपूर महात्म्य, हा ग्रंथ नीरा नदीचे ऐतिहासिक साक्ष सांगतो. जसे करहा नदीला ब्रह्मस्वरूप मानले जाते तसे नीरा नदीला विष्णू स्वरूप मानले जाते . नरसिंह हे विष्णूचे अवतार आहेत व नरसिंहपूर या ठिकाणी नीरा नदीकाठी नरसिंह मंदिर आहे.
मंदिराचे बांधकाम साधारणता इसवी सनाच्या आठव्या शतकामधील आहे. नीर या शब्दाचा अर्थ पाणी असा होतो, आणि या शब्दावरून या नदीला नीरा असे नाव मिळाले आहे. या नदीच्या नावावरून या नदीकिनारी दोन गावे आहेत पहिले म्हणजे, लोणंद जवळचे निरा आणि दुसरे नीरा नरसिंहपूर.
करहा, वेळवंडी, उंजवणी, पूर्ण गंगा, बानगंगा, खेमवती, या निरा नदीच्या उपनद्या आहेत. नीरा नदीवर भाटघर धरण व वीर धरण ही दोन महत्त्वाची धारणे आहेत. नीरा नदी उगम पावल्यानंतर पूर्वेस काही अंतर वाहते, त्यानंतर ती ईशानेकडे वळते, भाटघर जवळ आल्यावर तिला डावीकडून येळवंडी नदी मिळते, भोर पासून इंगवली गावापर्यंत तीव्र वळणे घेत, नीरा नदी पूर्ववाहिनी बनते. यानंतर ती पुणे जिल्ह्याची दक्षिण सीमा बनते, ती सातारा जिल्ह्यातील फलटण व माळशिरस या तालुक्यांमधून वाहते. पुण्याच्या आग्नेयस इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर जवळ ही नदी भीमा नदीला मिळते.
धन्यवाद!
तुम्ही वाचत आहात वायरल वार्ता ज्या ठिकाणी आम्ही रोजच लेटेस्ट अपडेट घेऊन येतो तेव्हा वाचत रहा व्हायरल वार्ता!
Viral Varta is our best news blog for latest updates, keep searching viral varta!