पालखी मार्ग कधी पूर्ण होणार ? Palkhi Marg Project 2024 | Alandi – Pandharpur


मित्रांनो पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये
आहे. असे म्हटले जाते की भगवान विष्णूंनी, पांडुरंगाच्या रूपामध्ये पंढरपूर मध्ये दर्शन
दिले होते. भक्तांसाठी पांडुरंग या ठिकाणी 28 युगांपर्यंत विटेवर उभे राहिले होते.
याच पंढरपूरमध्ये वर्षातून चार वेळा मोठे सोहळे पाहायला मिळतात. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून
वारकरी या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. जुलै महिन्यामध्ये होणाऱ्या पालखी यात्रेला,
मोठे महत्त्व आहे हा पालखी सोहळा पुण्यातील आळंदीपासून सुरू होऊन पंढरपूर मध्ये संपतो.
या पालखीसाठी दोन मार्ग आहेत.1) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि दुसरा 2) संत
तुकाराम महाराज पालखी मार्ग.

 या दोन्हीही रस्त्यांना राष्ट्रीय
महामार्गाचा दर्जा असून, दोन्हीही महामार्गांना चौपदरी बनवण्याचे काम सध्या सुरू आहे.
ज्यामध्ये दोन्ही बाजूला एक जादाचा लेन पालखी वारकऱ्यांसाठी असणार आहे, आणि हाच नितीन
गडकरींचा ड्रिम प्रोजेक्ट पालखी मार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्ते विकास प्रकल्पामध्ये
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग 224 किलोमीटरचा असणार आहे. जो दिवेघाटापासून मोफळ
पर्यंत असणार आहे. हा मार्ग सासवड, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि पंढरपूर
असा असणार आहे. यासाठी सात बायपास बनवण्यात येणार असून, याचा प्रस्तावित खर्च 6700
कोटी इतका आहे. या महामार्गाचा क्रमांक एन एच 965 असा आहे. या हायवेमुळे वारकऱ्यांना
अतिशय सोयी सुविधा युक्त रस्ता मिळणार आहे.    
रस्त्याच्या कडेला बारा विश्राम स्थळे उभारण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी वारकरी आराम
करू शकतात.

 श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग
135 किलोमीटर लांबीचा असणारा आहे. याचा महामार्ग क्रमांक एन एच 65 असा आहे. हा महामार्ग
पाटस वरून तोंडलेपर्यंत असणार आहे. यासाठी 4400 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग
बारामती अकलूज श्रीपुर बोरगाव या ठिकाणांवरून जाणार आहे. यासाठी एकूण पाच बायपास बनवण्यात
येणार आहे. या पालखी मार्गावर अकरा विश्राम स्थळे बनवण्यात येणार आहेत, ज्या ठिकाणी
यात्रेकरू विश्रांती घेऊ शकणार आहे. मित्रांनो हा फक्त एक महामार्ग नसून भाविक भक्तांना
त्यांच्या विठू माऊलीची भेट सुकर करून देणारा राजमार्ग आहे. गेल्या महिन्यातच नितीन
गडकरींनी या कामाचा आढावा घेतला व येत्या काहीच महिन्यांमध्ये हा पालखी मार्ग भाविक-भक्तांसाठी
खुला होणार आहे.

 मित्रांनो तुम्ही वाचत आहात वायरल
वार्ता. वायरल वार्तामध्ये आपण या संदर्भातील लेटेस्ट अपडेट घेऊन येणार आहोत. तेव्हा
हा लेख वाचत रहा आणि वायरल वार्ता या आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू
नका.

धन्यवाद!

Viral Varta is our best news blog for lates updates, keep searching viral varta!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top