Nira Narsingpur Temple History in Marathi


  Nira Narsingpur Temple History in Marathi

 निरा नरसिंहपुर या ठिकाणी नीरा  भीमा नदीचा संगम होतोया ठिकाणाला भौगोलिक  ऐतिहासिक महत्त्व आहेया क्षेत्राला त्रिवेणी संगमाचे ठिकाण तसेच दक्षिणेतील प्रयागराज असे संबोधले जातेया ठिकाणी श्री लक्ष्मी नरसिंहाचे मंदिर आहेया ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी भजन केल्याचेतसेच एकनाथ  नामदेव महाराज येऊन गेल्याचे पुरावे इतिहासामध्ये सापडतातमहाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे कुलदैवत आहेयेथील मंदिर एखाद्या राजवाड्याप्रमाणे दिसतेया मंदिराचा जिर्णोद्धार 16 व्या आणि 17 व्या शतकामध्ये करण्यात आला होता हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहेयेथील मूळ मंदिर इसवी सनाच्या आठव्या शतकामध्ये बांधले होतेनरसिंह मंदिरामध्ये भक्त प्रल्हाद  नरसिंहाची मूर्ती आहेवैशाख महिन्यामध्ये नरसिंह जयंती उत्सव या ठिकाणी दहा दिवसांसाठी होतोया उत्सवा दरम्यान दोन ते तीन लाख भाविक या मंदिराला भेट देतात.

संत तुकारामांनी या नदीच्या संगमाला त्रिवेणी संग म्हणून उल्लेख केला आहेत्रिवेणी म्हणजे तीन नद्यांचा संगमपहिली नदी भीमादुसरी निराआणि तिसरी म्हणजे गुप्तगंगा नदी होय.

राणी कायाधुने भक्त प्रल्हादाला या संगमाच्या ठिकाणी जन्म दिलाहिरण्यकश्यप हा भक्त प्रल्हादाचा पिता  कायाधू राणीचा नवरा होताहिरण्यकश्यपुणे घोर तपश्चर्या करून देवाकडून असा वर मागून घेतला कीमला दिवसा किंवा रात्रीघरामध्ये किंवा घराबाहेरमनुष्य किंवा प्राणी मारू शकणार नाहीहा वर मिळाल्यानंतर हिरण्यकश्यपू स्वतःला सर्वात श्रेष्ठ मानू लागलात्याने त्याच्या राज्यामध्ये देवाचे नाव घेण्यास बंदी घातलीजो कोणी या आदेशाचे पालन करणार नाही त्याला त्याने मृत्युदंड देण्याचा आदेश काढला.

हिरण्यकश्यपूचा स्वतःचा मुलगा भक्त प्रल्हाद याने तो आदेश मोडलाआदेश मोडल्यामुळे हिरण्यकश्यपुणे भक्त प्रल्हादाला मृत्युदंड दिलासगळ्यात प्रथम भक्त प्रल्हादाला उंच टेकडीवरून खाली टाकण्यात आले परंतु त्यावेळी देवाने भक्त प्रल्हादाला वाचवलेत्यानंतर भक्त प्रल्हादाला उकळलेल्या तेलाच्या कडे मध्ये टाकण्यात आलेयावेळीही भक्त प्रल्हादाला देवाने वाचवले.

शेवटी नरसिंहाचा अवतार घेऊन विष्णु देवाने हिरण्यकश्यपूला सायंकाळच्या वेळी घराच्या उंबरठ्यावर मारलेयावेळी ना दिवस होताना रात्र होती ना माणसाने मारले ना प्राण्याने मारलेअशा प्रकारे दिवाने त्यांचे वचनही पाहिले आणि हिरण्यकश्यपूचा वध सुद्धा करण्यात आलाहेच आहे निरा नरसिंह महात्म्य.

या मंदिराचा परिसर अतिशय शांत  रमणीय आहेपेशव्यांच्या काळामध्ये या मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करण्यात आला होतावारकरी संप्रदायाचा इतिहास आणि वारसा लाभलेले तसेच संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण नीरा नदीच्या देवत्वामध्ये महत्त्वाची भर घालते आणि याच ठिकाणी नीरा नदी भीमा नदीला मिळते.

     धन्यवाद! 

तुम्ही वाचत आहात वायरल वार्ता ज्या ठिकाणी आम्ही रोजच लेटेस्ट अपडेट घेऊन येतो तेव्हा वाचत रहा व्हायरल वार्ता!

Viral Varta is our best news blog for latest updates, keep searching viral varta!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top