Karad History in Marathi

 स्वातंत्र्याचा शेवटचा अभूतपूर्व लढा  :

. . १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरु झाले होते . राष्ट्रीय सभेतील लढाऊ गटाचे नेते सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीजपानमध्ये जाऊन भारतीय स्वातंत्र्युद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन त्याला सशस्त्र युद्धाचे स्वरूप दिले. त्याची प्रतिक्रिया देशातील राष्ट्रीय सभेवर देखील झाली. मुंबईस भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीने ऑगस्ट १९४२ रोजी *चले जावचा ठराव मंजूर केला. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू वगैरे सर्वच प्रथम दर्जाच्या नेत्यांनी ब्रिटिशांविरुद्ध अतिशय जहाल भूमिका घेतली. हिंसा, अहिंसेचा विचार बाजूला झाला. अगदी बंड करण्यासदेखील त्यांनी सांगितले. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसच्या या वरिष्ठ नेत्यांना ताबडतोब अटक करण्यात आली.

ऑगस्टला सातारा जिल्ह्यातील चौदा प्रमुख पुढार्‍यांना अटक करण्यात आली. त्यात कऱ्हाडचे पांडुअण्णा शिराळकर, गणपतराव आळतेकर, राघू अण्णा लिमये हेही होते. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीस यशवंतराव चव्हाण, काशिनाथ देशमुख, विठ्ठलराव पागे, गौरीहर सिंहासने आदी नेते हजर होते. या नेत्यांनी गुप्त बैठक घेऊनकरू अथवा मरूया आदेशाप्रमाणे कृती करावयाचे ठरवले.  यशवंतराव चव्हाण हे नेते गुप्तपणे जिल्ह्यात परतले. यशवंतराव इंदोलीमार्गे कऱ्हाडला आले लोकमत तयार करण्यासाठी प्रथम जाहीर सभा घ्यावयाचे त्यांनी ठरवले. त्यावेळी सातारा जिल्ह्यात एकूण १६७ मिरवणूका १४८ सभा झाल्या. त्यापैकी कऱ्हाड तालुक्यात ६१ मिरवणुका ५० सभा झाल्या. नंतर सर्वत्र मोर्चांची तयारी सुरू झाली. कऱ्हाडला ता. २४०८१९४२ रोजी म्हणजे अबघ्या पंधरा दिवसांत कऱ्हाड मामलेदार कचेरीबर मोर्चा नेण्यात आला. त्या अगोदर म्हणजे ऑगस्टला सायंकाळी बाबुराव गोखले यांचे भाषण झाले त्यांना अटक झाली.

 २४ तारखेला दोन गटांचा कार्यक्रम ठरवण्यात आला. पहिल्या गटाने न्यायालयासमोर निदर्शने करावयाची दुसर्‍याने मामलेदार (तहसिलदार) कचेरीबर मोर्चाने जाऊन तेथे तिरंगा झेंडा लाबायचा असे ठरले. पहिल्या गटाने दिनकरराव निकम, भिकोबा साळुंखे गणपतराब बटाणे यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयासमोर निदर्शने केली. त्यात वकिलांनी वकिली सोडावी, सरकारी नोकरांनी नोकऱ्या सोडाव्यात अशा  घोषणा दिल्या. याच दिवशी दुसर्‍या गटाने बाळकृष्ण आनंदराव पाटील उर्फ दादा उंडाळकरांच्या नेतृत्वाखाली मामलेदार कचेरीवर २५०० लोकांचा मोर्चा नेला. पोलिसांनी तो अडवला. त्यानंतर तेथे सभा झाली. दादांना अटक झाली. लोक प्रक्षुब्ध झाले. दादांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितले. लढा अहिंसक मार्गाने चालावा असे आवाहन केले. तरीही लोक कचेरीत घुसण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळीही पांडुरंग देशमुख यांच्या हातावर संगिनीचा वार बसला. नंतर कृष्णाबाई घाटाबर मोठी सभा झाली.  बातावरण तापू लागले.

यशवंतराव चव्हाण, गौरीहर सिंहासने या कऱ्हाडच्या नेत्यांना पकडून देण्यासाठी हजार रुपयांचे बक्षीस लागले. यशवंतराव चव्हाण हाती लागावेत म्हणून त्यांच्या गृहलक्ष्मींना सौ. वेणूताईनादेखील सरकारने तुरूंगवास घडविला. प्रांतातील विध्वंसक चळवळीचे प्रमुख अण्णासाहेब सहस्रबुद्धे हे होते. कऱ्हाडचे सदुभाऊ पेंढारकर हे त्यांच्याशी जिल्ह्यात्फे संपर्क ठेबत, नंतर चळबळ चालविण्यासाठी निरनिराळ्या भागातील गट स्थापून त्यांच्यावर त्या त्या भागाची जबाबदारी सोपवण्यात आली. सबंध जिल्ह्यासाठी एकूण गट तयार करण्यात आले. त्यात कऱ्हाड भागासाठी यशवंतराव चव्हाण गट ७५ लोकांचा काशिनाथ देशमुख गट ३० जणांचा होता. कऱ्हाडच्या या गटाने कऱ्हाड चावडी, उंब्रज, मल्हारपेठ येथील डाकबंगले, कऱ्हाडचे टिळक महाराष्ट्र हायस्कूल यांना आगी लाबल्या. सदाशिबराब पेंढारकरांच्या पुढाकाराने शिरबडे स्टेशन जाळले. या कामी त्यांना वर्षांची शिक्षा झाली. ती भोगत असतानाच त्यांचे कॅन्सरच्या विकाराने निधन झाले. ओगलेवाडीविटा रस्त्यावरील पूल उडवून देण्यात आला. सुरली घाटात टपाल मोटार लुटली.

  जून १९४५ रोजी नाना पाटील गटाने बिचूदशेणोली दरम्यान पगाराची आगगाडी लुटून बीस हजार रूपये नेले.  डिसेंबर १९४२ पर्यंत यशवंतराव चव्हाण जिल्ह्यातील चळवळीचे काम पहात असत. जानेवारी १९४३ मध्ये प्रमुख असे नेते पकडले गेले. त्यानंतर जबाबदारी कऱ्हाडचे धन्वंतरी म्हणजे लक्ष्मण गणेश कासेगावकर यांच्याकडे आली. याच सुमारास माधवराव जाधव यांनी कऱ्हाड शहर पोस्टाची थैली लुटली पोलीस पाठलागाची पर्वा करता भुईकोट तटावरून ३५ फुटांची उडी मारुन ते पसार झाले. . . १९४४ नंतर जानेबारीत खोडशीमुंढे येथील तारा तोडल्या गेल्या. रामचंद्र हरी पवार यांची बंदूक लांबवली गेली. २६जानेवारीची पत्रके चिकटवत असताना माधवराव
जाधव पकडले गेले. या काळात सरकार अगदी त्रस्त होऊन गेले होते. कऱ्हाडला तर लष्करच आणले
गेले. सामुदायिक दंडही बसबण्यात आला.

 १४ जून १९४४ रोजी इतर कार्यकर्त्यांबरोबरच माधवराव
जाधव यांनी आपली कऱ्हाडच्या तुरुंगातून सुटका करून घेतली.  पुढे क्रांतिकारकांनी प्रतिसरकारची भूमिका स्वीकारली.
या नात्याने न्यायदान, गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा, संरक्षण ही कामे पण सुरू केली. सबादे
येथील न्यायदान चांगलेच गाजले. तर तुळसण येथील चोरी पकडून ज्याच्या वस्तू त्यास दिल्या
गेल्या.

२६ डिसेंबर १९४४ रोजी
कऱ्हाड मुख्य पोलीस ठाण्यातूनच पोलिसांच्या साहाय्यानेच बंदूक काढली. त्यात तीन पोलीस,
महिंद मास्तर ब इतर ६-७ जणांबर खटला घालूनही सर्ब निदोंष सुटले. जिल्ह्याचे एक नेते
रामानंद स्वामी सभा व मिरवणुकाद्वारे अखंड प्रचार करीत होते. अतिश्रमाने ते आजारी पडले.
गोंदी, ता. कऱ्हाड येथे त्यांना अटक झाली. पुढे अटकेतच त्यांना कऱ्हाडला ब औंधला आणण्यात
आले. कऱ्हाडला भडकमकर दवाखान्यात डॉ. श्री. म. कुलकणी यांच्याकडे रुग्ण म्हणून ते राहिले
तर औंधला आप्पासाहेब पंत यांनी त्यांना संभाळले.

१२ जून १९४६ रोजी
किसन न्हाबी कऱ्हाडकर यास सरकारचा खबऱ्या म्हणून पत्र्या मारल्या. (पायाच्या तळव्यावर
काठीने मारणे). यापुढील काळातही सरकारी बगलबच्यांना शिक्षा देणे, रायफली, बंदुका हिसकावून
घेणे, दारुच्या भट्ट्या उद्ध्वस्त करणे अशी कामे चालू होती. नडशी या गावी हतुतूच्या
(कब्बड्डी) सामन्यासाठी मुले जमली होती. त्याला हजारेक पोलिसांनी वेढा घातला. परंतु
या वेढ्यातून माधबराब जाधब, धन्वंतरी हे सुरक्षितपणे सुटून गेले. तेथून बा मंडळींनी
तळबीड येथे सभा घेतली. तेथे वाचनालय व सेवादलाची शाखा सुरू केली.

पुढे २६ ऑगस्ट १९४६
रोजी माधवराव जाधव व २ सप्टेंबरला धन्वंतरी पकडले गेले. नंतर दीड महिन्यांनी तुरुंगातील
६० लोकांनी उपोषण सुरू केले. सात दिवसानंतर सरकारने शरणागती पत्करली.  या क्रांतिपर्बात कऱ्हाडजबळील टेंभू या गावाने लक्षात
येण्यासारखी कामगिरी बजावली. तेथील मारुतराब तांबवेकर ब तासगाबच्या महारुट्रस्वामी
यांनी सेवादल प्रबळ केले. अनेक तऱ्हेची विधायक कामे सुरू केली. श्रमदान, न्यायदान अशी
कामे सुरु केली.

९ ऑगस्ट १९४५ ला आगरकर
माळावर जी. डी. लाड यांचे व्याख्यान व्हावयाचे होते. त्यावेळी गोळीबार झाला. किसन भुसारी
यांस गोळी लागली. त्याच्या शुत्रूषेसाठी सर्व एकत्र आले. तेव्हा सर्वांना अटक झाली
ब मारहाण करण्यात आली.  कर्‍्हाडमध्ये शांताराम
इनामदार, बाबुराव कोतवाल, बाळ भुर्के, शामलाल खोजा, डी. एम्‌. पाटील, नेमचंद शहा, माधवराव
जाधव, शांताराम गरूड, राजाराम कुलकर्णी, आत्माराम जाधव, काँ. डी. जी. देशपांडे अशा
तरुणांचा गट कार्यरत होता. त्याबेळच्या सातारा जिल्ह्यात भूमिगत कार्य करणाऱ्या परिसरातील
स्वातंत्रयैनिकांना प्रेरणा देण्याचे काम करणारांत नाना पाटील यांचा महत्त्वाचा वाटा
आहे. आपल्या तुफानी भाषणांनी त्यांनी सबंध जिल्हा ढबळून काढला.

इ.स. १९३१ पासून त्यांनी
केलेल्या कार्याचा प्रभाब बाढला होता. इ.स. १९३७ मध्ये कराड येथे झालेल्या जाहीर सभेत
पंडित नेहरूनी
नाना पाटलांसारखा पैलवान आमच्याबरोबर असल्यावर
स्वराज्य आता कितीसे दूर आहे ?
‘ असा प्रश्‍न त्यावेळच्या विराट लोकसमुदायास
विचारला होता. इ.स. १९४२ च्या *चलेजाव’ चळवळीत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, रामानंद
भारती, किसनवीर, बडे मास्तर, पांडुमास्तर यांच्याबरोबरच नाना पाटलांनी अस्सल ग्रामीण
ढंगाच्या मराठीत बोलून सभा गाजवबिल्या. समांतर शासन निर्माण करण्याच्या कल्पनेतून सातारा
जिल्ह्यात प्रतिसरकार निर्माण करण्यात आले. गुन्हेगारांना व देशद्रोह्यांना ते पत्री
ठोकण्याची शिक्षा देत असल्याने त्याला पत्री सरकार असेही म्हटले जाई. या प्रतिसरकारचे
नेते नाना पाटील *क्रांतिसिंह* म्हणून ओळखले जाऊ लागले.  १९४२ चे क्रांतियुद्ध हे सातारा जिल्ह्याच्या इतिहासातील
एक महान पर्व होते. समाजाच्या सर्व स्तरातील हजारो लोकांनी आपला सहभाग त्यात दिला होता.
त्यासाठी पराकाष्टेचा त्याग करून अगणित कष्ट सोसले होते.

 ता. ५ मे १९४६ रोजी सर्व भूमिगत कार्यकर्ते कोणेगाव
(ता. कऱ्हाड) येथे प्रकट झाले. त्यांचा भव्य सत्कार जनतेने केला. कऱ्हाडच्या प्रमुख
बाजारपेठांतून भूमिगत कार्यकतत्यांची प्रचंड मिरवणूक व सत्कार स्वामींच्या बागेत झाला.  या क्रांतिपर्वाशी एका थोर व्यक्तींचा संबंध आहे.
ती व्यकती म्हणजे सुप्रसिद्ध साम्यवादी कार्यकर्ते भाई विष्णुपंत चितळे. भाईंचे पुढील
कर्तृत्व पुण्यातच घडले. पण त्यांच्या कार्याची सुरुबात कऱ्हाड येथे झाली.

इ. स. १९३६ च्या सुमारास
ते सातारा जिल्ह्यात आले. कऱ्हाड तालुका हे त्यांनी आपले कार्यक्षेत्र निश्‍चित केले.
सर्व तालुकाभर पायी फिरून त्यांनी प्रचार केला. अनेक माणसे जमवली. अनेक शेतकरी तरुण
त्यांच्या भोवती गोळा झाले. कऱ्हाड येथे त्यांनी वाचनालय सुरू केले. तरुण कार्यकर्त्यांचे
शिबिर घेतले. पुढील काळात त्यांनी प्राथमिक शिक्षकांची संघटना बांधली. प्राथमिक शिक्षकांचा
चोपन्न दिवसांचा अभूतपूर्व राज्यब्यापी संप झाला. त्यात सातारा जिल्ह्यातील यशाचे श्रेय
विष्णुपंतांकडेच जाते. विष्णुपंत पुढील काळात साम्यवादी पक्षाचे भारतीय पातळीवरील नेते
झाले.

 १९४२ मधील क्रांतियुद्धाबद्दल भूमिका घेण्याची पाळी
आली, त्यावेळी भाईंनी आपल्या पदाविरुद्ध जाऊन या लढ्याची बाजू घेतली. यशबंतराब चव्हाण
ब इतर काँग्रेस नेत्यांनी त्यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते.  दुसर्‍या महायुद्धानंतर भारताचे स्वातंत्र्य जबळ
येऊ लागले.

इ. स. १९४३ मध्ये
बाबुराव गोखले सुटले होते. त्यावेळी त्यांनी ज्वलंत झालेल्या अन्नसमस्येसंबंधी सांगलीच्या
*लोकसखा’ व सातारच्या *श्रीशाहू*मधून अनेक बिधायक सूचना केल्या. त्यातील काही सरकारने
स्वीकारल्या. कापील येथे बभ्रुवाहन जाधब इत्यादींनी सातारा जिल्हा विद्यार्थी परिषद
भरवली ब त्यामध्ये म. गांधींच्या चळवळीला पाठिंबा दिला. त्यामुळेच भडकून जाऊन या परिषदेला
पाठिंबा देणाऱया बाबुराव गोखले, पांडुतात्या डोईफोडे, गंगाधर पागे प्रभूतींवर फिरुन
स्थानबद्धतेची पाळी सरकारने आणली.  शेवटी १५
ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.

Thanks for reading Viral Varta, we are write about trending viral varta in marathi. Keep reading viral varta.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top