कऱ्हाडमधील अर्वाचीन स्मारके:
यशवंतराव चव्हाण समाधी:
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे निधन २५ नोव्हेंबर १९८४ रोजी झाले. त्यांच्या पार्थिवावर २७ नोव्हेंबर १९८४ रोजी कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर कऱ्हाडचे लोकप्रिय नगराध्यक्ष पी. डी. पाटील व शहर नगर परिषद यांच्या पुढाकाराने त्यांच्या दहनस्थानी एक अतिशय सुंदर असे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले. कोल्हापुरचे वास्तुतज्ज्ञ बेरी यांनी या स्मारकाचे आरेखन केले आहे. ही समाधी अष्टकोनी असून तिची लांबी रूंदी २०‘)(२०‘ एवढी आहे. समाधीभोवती ८‘2(६‘ रूंदीची परिक्रमा आहे. त्याच्या बाहेर १६ फूट रूंद ब ४ फूट उंच कठडा आहे. समाधीच्या पूर्वेस पाणघाटावर ३०१)(३०‘ आकाराचा अष्टकोनी चौथरा आहे.
तेथून समाधीकडे जाणाऱ्या मार्गाची रूंदी १५ फूट व लांबी ९५ फूट आहे. बरील चबुतरा, समाधीमार्ग ब समाधी आणि तिच्याभोबतालची परिक्रमा ही परस्परास मोठ्या कलात्मकतेने एकमेकाला जोडलेली आहेत. हे सर्व काम गोकाक सँड स्टोनमध्ये तर् बांधकामामधील जाळी संगमरवरी आहे. परिक्रमा, चौथरा व मधला मार्ग या सर्वांवर आग्रा टाईल्स तर समाधीच्या सभोवार व माथ्यावर पिंक शेडची ग्रेनाईट स्टोन फरशी बसवलेली आहे. समाधीवर फरशी बसवण्यापूर्वी त्यामध्ये एक ताप्रमंजुषा ठेवलेली आहे. त्यात चव्हाणसाहेबांचे साहित्य, त्यांच्यासंबंधीचे
ग्रंथ, त्यांची भाषणे, लेख, नियतकालिके, विशेषांक, दैनिके, साप्ताहिके, पत्रे, छायाचित्रे इत्यादी साहित्य ठेवलेले आहे. मंजुषेवर त्यांचे चाश््रि कोणण्यात आले आहे. समाधीचे काम दि. २५ नोव्हें. १९८८ रोजी पूर्ण झाले. समाधीच्या दक्षिणेला ५०*)(२३‘ आकाराची पर्णकुटी नावाची एक सुरेख इमारत बांधली आहे. त्याचा नक्की उपयोग मात्र नीटसा कळत नाही.
सौ. वेणुताई चव्हाण स्मारक भवन यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी सौ. वेणुताई चव्हाण यांचे निधन १ जून १९८३ रोजी झाले. त्यानंतर यशवंतरावांनी आपले इच्छापत्र लिहिले, “माझी पत्नी कै. सौ वेणुताई हिचे स्मरणार्थ मी एक सार्वजनिक न्यास करणार आहे. त्या दृष्टीने माझ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माझ्या गावी कऱ्हाड येथे एखादी जमीन विकत घेऊन त्यावर एखादी वास्तू बांधावी व अशा वास्तूत माझ्या स्वत:च्या ग्रंथालयातील अनमोल ग्रंथ ठेवावेत. तसेच माझ्या जीवनात अनेक व्यक्तींनी व संस्थांनी अनेक वस्तू मला प्रेमाने भेट दिल्याआहेत. त्यांचेही संरक्षण व्हावे व वस्तुसंग्रहालयाच्या रूपाने त्यांचे जतन व्हावे, अशी माझी इचच्छा आहे आणि हे ग्रंथालय ब वस्तुसंग्रहालय माझ्या पत्नीची स्मृती म्हणून त्याच्या दैनंदिन जपणुकीची आणि वाढीची योजना करावी असा संकल्प आहे.
या स्मृतिमंदिरासाठी जी रक्कम लागेल त्यापैकी शक्य तो भाग मी देणार आहे. देणगी म्हणून, माझ्या पत्नीचे दागदागिने आहेत. मौजे उरळीकांचन येथील बागायत जमीन विकून जी रक्कम येईल ती सारीच्या सारी वरीलप्रमाणेच या न्यासास द्यावी.” ७–१०–१९८३ चे हे पत्र आहे व त्याप्रमाणे अस्तित्वात आलेले स्मारक म्हणजे सौ. बेणुताई चव्हाण सभागृह भवन. आपल्या हयातीतच हे काम व्हावे असा यशवंतरावांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी सौ. वेणुताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट निर्माण केला ब १ जून १९८४ रोजी म्हणजे सौ. वेणुताईच्या प्रथम पुण्यतिथीदिवशी त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना उपस्थितीत स्वत:च स्मारकाचे भूमिपूजन केले ब वेणुताईची प्रथम पुण्यतिथी पं. भीमसेन जोशी यांच्या संगीत मैफलीने केली.
पुढे २५ नोव्हेंबर १९८४ ला यशवंतरावांचेही निधन झाले. त्यामुळे पुढील कामाची अंमलबजावणी ट्रस्टने केली. या स्मारकासाठी शिवाजीनगर को.-ऑप. हौसिंग सोसायटीने नाममात्र एक रुपया भाड्याने १७–१८ गुंठे जागा दिली. स्मारकाचे उद्घाटन २५ नोव्हेंबर १९९२ रोजी झाले. स्मारकाच्याभोवती सुंदर बाग आहे. दारात यशवंतराव १९६२ पासून वापरत असलेली अम्बेसिडर गाडी आहे. स्मारकाच्या आत ३०2(८५ फुटांचे सभागृह आहे. त्याच्या दोन्ही बाजूस यशवंतराव व सौ. वेणुताई यांचे अर्धपुतळे आहेत. या सभागृहास लागून २५2(३२ फुटांचे ग्रंथालय आहे. तेथे काचेच्या लाकडी कपाटात यशवंतरावांचा सुमारे ७००० दुर्मिळ व मौलिक ग्रंथसंग्रह, तीनशेच्यावर जुन्या मासिकांचे बांधीव गट्टे व दर्मिळ छायाचित्रांचे सारे संग्रह आणि त्यांच्या भाषणांच्या साठ कॅसेटस् आहेत.
याशिवाय यशवंतरावांच्या चाळीस वर्षांच्या वैयक्तिक पत्रव्यवहाराच्या असंख्य फायली, हजारो हस्तलिखिते, कागदपत्रे, लेख, भाषणे, मुलाखती व आठवणी, गौरवांक, विशेषांक आदि साहित्य आहे. या ग्रंथालयाचे रूपांतर संशोधन ग्रंथालयात झाल्याने ब त्याचा फायदा अनेक लोक घेत असल्याने त्यात दिवसेंदिविस
वाढ होत आहे. ग्रंथालयाच्या दुसऱ्या बाजूस
२५९३२ फुटांचे कलादालन आहे. तेथे यशवंतराबांना देश परदेशात भेट मिळालेल्या वस्तू कलात्मक
रीतीने ठेवण्यात आलेल्या आहेत. सौ. वेणुताई व यशवंतराव नेहमी वापरत असलेले कपडे ब इतर
बस्तूही एका काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेले आहेत.
ग्रंथालयास लागून २०)( ३२ फुटांचे दालन आहे. त्यात चाळीस व्यक्तींची बसून वाचण्याची
सोय आहे. यशवंतरावांच्या इच्छेप्रमाणे या स्मारकभवनाच्या
पहिल्या मजल्यावर एक सांस्कृतिक सभागृह उभारण्याचे विश्वस्तांनी ठरवले. त्याचे उद्घाटन
२१ जून २००१ रोजी पं. भीमसेन जोशी यांच्याच गायनाने झाले. या अद्यावत सभागृहात एकूण
५५३ प्रेक्षकांच्या बसण्याची सोय आहे. संपूर्ण सभागृह हे अत्याधुनिक ध्वनिशात्रावर
आधारित असून छत व भिंतींची विशेष रचना केली आहे. आधुनिक नाट्यगृहाला व सभागृहाला लागणाऱ्या
सर्व सोयी येथे आहेत. सौ. वेणुताई चव्हाण स्मारक
भवन हे केवळ कऱ्हाडलाच नव्हे तर महाराष्ट्राला भूषण असे आहे.
स्वातंत्र्यसैनिक
स्मृती :
१९४२ च्या क्रांती आंदोलनाची सुरवात
कऱ्हाडमध्ये २४-८-१९४२ रोजी झाली. त्यादिवशी बाळकृष्ण आनंदराव पाटील ऊर्फ दादा उंडाळकर
यांचे नेतृत्वाखाली कऱ्हाडच्या मामलेदार कचेरीवर भव्य मोर्चा नेण्यात आला होता. त्यानिमित्ताने
मामलेदार (तहसील) कचेरीमध्ये आता एक स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. तसेच कराड नगरपरिषदेच्या
आवारातही एक स्मृतिशिला आहे. तीवर भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कऱ्हाडकर स्वातंत्र्यवीरांची
नावे कोरण्यात आली आहेत. श्री. अंतुले हे मुख्यमंत्री
असताना महाराष्ट्रात सर्वत्र हुतात्मा स्मारके उभारण्याची योजना त्यांनी राबवली.
त्या योजनेअंतर्गत कऱ्हाडच्या दक्षिणेकडे पुणे –बंगळूर हमरस्त्याजवळ असे स्मारक उभारले आहे.
काही ऐतिहासिक घराणी :
वाईस उंब्रजकर व आंधळीकर असे दोन देशपांडे आहेत. वाई परगण्याला प्रथम एकच आंधळीकर देशपांडे होते. तथापि, त्यांच्या घरी एक बेळ कर्ता पुरूष नाही, पोरवडा झाला, त्याचा गैरफायदा घेऊन क्षीरसागर नावाच्या एका मनुष्याने देशपांडेपणाचे वतन थिट्यांच्या घरातील आहे असा बनाव करून विजापूरच्या सुलतानाकडून सनद मिळविली. पुढे आंधळीकर देशपांड्यांची मुले कर्ती झाल्यावर हे वतन परत मिळविण्यासाठी त्यांनी दावा केला. त्या दाव्यासाठी त्यांनी आपले गोत्रज उंब्रजकर म्हणजेच कऱ्हाडकर देशपांड्यांची मदत घेतली व त्या मदतीपोटी आपल्या वतनाचा अर्धा हिस्सा कऱ्हाडकर देशपांड्यांना दिला असे सांगितले जाते.
ईतील दगडी दरवाजा देशपांड्यांना कऱ्हाडकर (उंब्रजकर) देशपांडे म्हणतात. शिवाजी महाराज ब संभाजी महाराजांच्या काळात विजापूरच्या आदिलशहाच्या बाजूने काम करणारा कासी तिमाजी हा या घराण्यातील कर्तबगार पुरुष होऊन गेला. तो धार्मिक वृत्तीचा म्हणून त्याला दियानतराव ही पदवी आदिलशाही दरबारातून मिळाली. (दियानत – धार्मिकता) शाह गादीवर येईपर्यंत कऱ्हाडकर देशपांडेच प्रमुख होते. १ फेब्रुवारी १६७६ च्या पालीच्या महजरात या देशपांड्यांचा उल्लेख ‘देशकुलकर्णीं मजकूर (कऱ्हाड) व सरदेशमुखी महालानिहाय‘ असा आला आहे. कऱ्हाडात कऱ्हाड़कर, वाईकर आणि कडेगावकर अशी तीन देशपांड्यांची घराणी मुसलमानी अंमलापासून आहेत.
या घराण्यातील रुद्राजी चंद्रो यांची कन्या म्हणजे समर्थ रामदासांची अनुग्रहित व एकनिष्ठ शिष्या अक्काबाई. त्यांनी रामदासांच्या मृत्यूनंतर सज्जनगडावर सतरा बर्षे व्यवस्था पाहिली. रामदासांचे बंधू श्रेष्ठ यांचे नातू गंगाधरस्वामी यांना जांबेतून आणवून गादीवर बसविले. अक्काबाईंची समाधी सज्जनगडावर आहे.