Krishna-Koyana Ghat Karad
घाट :
कृष्णा – कोयना या नद्यांच्याकाठी कऱ्हाडकर नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पायऱ्यापायर््यांनी नदीकडे उतरत जाणारे घाट सध्या जरी नदीच्या प्रवाहापासून बरेच अलीकडे असल्याचे दिसत असले तरी मुळात ते नदीच्या प्रवाहालगतच होते. १८६० मध्ये खोडशीचे धरण झाल्यावर कृष्णेचा प्रवाह घाटापासून उत्तरेकडे सरकला.
सर्वांत जुना घाट रंगारवेसेजवळचा. २४९ फूट लांब ब ७८ फूट रूंद असा हा घाट गाबकऱ्यांनीच कोयनेच्या काठावर १७२७ मध्ये बांधला. १७५४ मध्ये अंताजी वासुदेव मुतालिक यांनी तत्कालीन स्वामीच्या बागेच्या कोपऱ्यावरील पिंपळापासून ८४ फूट लांब आणि ४६ ‘/, फूट रूंद असा घाट बांधला होता. याच बर्षी श्रिमलपंत देशपांडे यांनी देशपांडेआळीचा ८२ ‘/. फूट ३७ ‘/. फूट आणि कमळेश्वराच्या देबळाजबळ १२४ ‘/_ फूट लांब ब २४ फूट रूंद परशुराम नाईक अनगळ यांनी असे घाट कृष्णाकाठी बांधले. कृष्णाबाईच्या मंदिरापासून कृष्णेच्या तत्कालीन पात्रापर्यंतचा घाट १७७७ मध्ये आबा खानबेलकर निसब्बत पंतप्रतिनिधी यांनी बांधला आणि गरूडमामांच्या देवळापासून कृष्णाबाई मंदिरापर्यंतच्या घाटाची पुरवणी (३०९ फूट 2२४ फूट ) शामजी व्यंकटेश काळे यांनी १८३३ मध्ये जोडली. त्यापूर्वी १७८२ मध्ये देशपांडे आळीच्या घाटास लागून ४० फूट लांब ब॒ ३१ फूट रूंद असा घाट निरंजनस्वामीच्या स्मरणार्थ त्यांच्या शिष्यांनी बांधला.
गवळवबेशीस बहिरबपंत गिजरे यांनी ६० फूट लोब ४८ फूट रूंद आणि बेण्णाई तुळसणकरीण यांनी २४ फूट लांब ३६ फूट रूंद असा घाट १८३८ मध्ये बांधला. संगमाजवळ संगमेश्वर महादेवाच्या पलीकड़े कोटाखाली असलेल्या उंचबट्यास लागून ज्या झिजलेल्या पायऱ्या होत्या त्या कोटातील देवळावरून नदीवर जाणार्या घाटाच्या असणे शक्य आहे. प्रतिवर्षी पुराच्या काळात पाण्याबरोबर येणारा मातीचा गाळ या घाटावर एबढा साचत गेला की आज कृष्णाबाईच्या मंदिरासमोर दिसणाऱ्या ‘पायऱ्यापावऱ्यांचा
घाट आणि त्याच्या टोकाला असलेले सुंदर बुरूज तेथे होते की नव्हते हे कळेनासे झाले होते. पन्नास पाऊणशे बर्षे साठलेला गाळ १९४१ मध्ये गावकऱ्यांनी श्रमदानाने काढून त्याला पूर्ववैभव प्राप्त करून दिले.
त्यामुळेच गेल्या काही वर्षांत श्री कृष्णाबाईच्या उत्सवकाळात होणाऱ्या रंजनात्मक कार्यक्रमासाठी प्रशस्त प्रेक्षागृहच घाटाच्या रूपाने उपलब्ध झाले आहे.
पार :
सोमवार पेठेत गोपाळकृष्ण मंदिराच्या उत्तर बाजूस, तसेच कोटात चढताना सिद्धिविनायक मंदिरालगत वडाच्या झाडाखाली, कृष्णाबाई घाटावर सध्याच्या ज्ञानेश्वर कमानीलगत व प्रीतिसंगम उद्यानात यशवंतराव चव्हाणांच्या समाधीच्या पूर्वेला तसेच परिपूर्णानंद स्वामींच्या समाधीलगत एक, सात शहीदाजवळ, रविवारात पागे यांच्या घराजवळ असे प्राचीन पार आहेत.
देशावरून कोकणात जाणारे जे इस्ते आहेत त्यात कऱ्हाडहून गुहागरला जाणारा रस्ता आजच्याप्रमाणेच प्राचीन काळीही महत्त्वाचा होता. कऱ्हाडला असणारी लेणी हा जसा त्यासाठीचा पुरावा आहे, तसाच कऱ्हाडजवळ आणि कोकणरस्त्याजवळ असणारे किल्ले हा देखील महत्त्वाचा पुराबा आहे. कऱ्हाडजबवळील सदाशिवगडपासून ही किल्ल्यांची रांग सुरू होते. सदाशिवगड, वसंतगड, दातेगड, मोरगिरी ब शेवटी भैरवगड असे हे किल्ले आहेत. त्यावरून जुन्या राजबटींना या रस्त्याचे बाटणारे महत्त्व लक्षात येते. कऱ्हाडचा किल्ला डोंगरी नसला तरी कऱ्हाड सुभ्याचे ठिकाण म्हणून त्याचे महत्व आगळेच आहे.
कऱ्हाडचा भुईकोट किल्ला कऱ्हाडला असलेल्या कृष्णा ब कोयनेच्या संगमाच्या दक्षिणेकडील बेचक्यात हा किल्ला वसला आहे. भुईकोट असला तरी तो शहराच्या सपाटीबर नाही. थोडासा उंच आहे. यालाच पंताचा कोट असे म्हणतात. कऱ्हाड शहरातून कोटात जाताना गणपतीचे
देऊळ ब कृष्णाबाई मंगल कार्यालय या दरम्यान एक छोटेसे चढाचे बळण लागते. गणपतीला लागूनच
सरळ पायर््यादेखील आहेत. पूर्वदेखील या दगडी पायर्या होत्या ब आता त्या जीणौंध्दारित
आहेत. पायर््याजवळ एक प्रचंड वडाचे झाड आहे. गणपतीमागे कोटाचे प्रवेशद्वार होते. त्यानंतर
जरा चढून गेले की वहिवाटदारांचा जुना मराठमोळा पध्दतीचा बाडा होता. या बाड्याबरून थोडे
डाबीकडे ब पुन्हा पश्चिमेला गेले की श्री भवानी मंदिर लागते.
श्रीनिवास प्रतिनिधी
यांच्या पत्नी काशीबाई यांनी इ. स. १८०० मध्ये हे मंदिर बांधले. या मंदिरावरून जरा
खाली गेले की प्रचंड स्वरूपाची नकट्या राबळ्याची बिहीर लागते. त्यावरून पुढे गेले की
कोटातील मुख्य चौक लागतो. या चौकाच्या जरा पुढे उजबीकडे प्रतिनिधींचा राजवाडा ( येथे
आता महाराष्ट्र हायस्कूल आहे.) आहे. या राजवाड्याच्यासमोर कोटाचे वहिवाटदार असलेल्या
पेंढारकरांची घरे आहेत. सर्व कोटाभोवती बारा बुरुजांनी युक्त अशी दगडमातीची तटबंदी
आहे. इतिहासकाळात आपल्याला एकदम घेऊन जाणारी
बास्तू म्हणजे कोटाची तटबंदी होय. प्रवेशद्वार पूर्वेकडे, नंतर प्रत्येक बाजूला मध्ये
दोन ब कडेला दोन असे चार बुरूज होते. त्यांची एकूण संख्या बारा होते. आजच्या पालकर
शाळेच्या मागे असलेला दक्षिण-पूर्वेला असलेला बुरूज हा अजून तरी सर्वांत सुस्थितीत
असलेला बुरूज होय. त्यानंतर उजव्या बाजूच्या कोयनेकडील बुरूज काही वर्षांपूर्वी चांगला
ओळख्यू येत होता. आज तशी स्थिती नाही.
त्यानंतर प्रीतिसंगमाच्या बाजूला असलेल्या बिबेकानंद
शिक्षण संस्थेच्या जबळ असलेला बुरूज चांगल्या अबस्थेत आहे. नंतर पूर्वेकडे निघाले की
पाणदरबाजा म्हणजे नदीकडे जाणारा दरवाजा. या जवळचा बुरूजही चांगल्या अवस्थेत आहे. त्याच्या
जंग्या, नक्षी सर्व काही दिसते. या बुरुजावरून आपल्याला तत्कालीन बांधकामाची कल्पना
येते. पाणदरवाजावरून खाली गेले की येते स्वामीची बाग ब यशवंतराव चव्हाण समाधी परिसर.
या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे बीस एकर असावे. किल्ल्याच्या चारही बाजूंनी खालचे
दगडीकाम वरचे बीटकाम, मातीकाम दिसते. पूर्वेला झालेल्या दाट घरांमुळे तर पश्चिमेला
दरवर्षीच्या पुरामुळे कसलाच मागमूस राहिला नाही.
उत्तरेकडे म्हणजे स्वामीच्या बागेकडे
उतार दिसतो. बांधकाम मात्र दिसत नाही. कोटाच्या
मुख्य दरवाजाजवळ दोन बुरूज होते. एवढेच नव्हे तर बरती नगारखाना पण होता. पाणदरबाजाचे
तोंड मात्र नदीकडे नसून पश्चिमेला होते. किल्ल्यांच्या दरवाजाची पध्दत अशीच असते.
या दरबाजाजवळील बुरूजात एक बीरगळ पण बसवला आहे.
चंतांचा वाडा कोटाच्या मध्यभागी पण थोडासा ईशान्येला आहे. म्हणजे होता. त्याचे
तोंड पश्चिमेला होते. संपूर्ण वाडा अगदी अलीकडेच पाडून तेथे नवीन बांधकाम केले आहे.
वाडा दुमजली होता. सुरूवातीला दिंडी दरबाजा असलेला मोठा लाकडी दरवाजा, दोन्ही बाजूंना
ओवऱ्या आणि मराठा पध्दतीप्रमाणे मोठा चौक व॒ बाजूला इमारत होती. दरवाजाच्या दक्षिणेला
८३2९३१ फूट असा दरबार हॉल होता. मध्ये १४ फुटांची मोकळी जागा ब दोन्ही बाजूंना खांब
होते. हॉलच्या पूर्व भागात भवानी देवीसाठी उंचबट्याची जागा होती. त्याला भवानी मंडप
म्हणत. गॅझेटिवरने या वास्तूचे फार चांगले बर्णन केले आहे. दिवाणखान्याचा कडिपाट चांगला
सागवानी असून त्याला काळा रंग दिला होता. हा महाल काशीबाई यांनीच १८०० च्या सुमारास
बांधला व बाकीचा बाडा पण त्याच पध्दतीने पुरा करण्यात आला.
या वाड्यात पुढे १९०६ मध्ये
काड्यापेट्यांचा कारखाना निघाला व त्यामुळेच वाड्याला मोठी आग लागली होती. यानंतर कोटातील पुराणबस्तू म्हणजे भबानी मंदिर होय.
हे देऊळ बर उल्लेखिल्याप्रमाणे मातुश्री काशीबाई यांनी बांधले. देऊळ तसे साधेच आहे.
भवानी मूर्ती नऊवारी पातळातील आहे. पण या मूर्तीचा जो चौथरा आहे तो मात्र एकदम प्राचीन
काळातील म्हणजे ९ ते ११ ब्या शतकातील शिल्पपध्दतीचा आहे. त्यामध्ये नक्षी व तीन उत्कृष्ट
मूर्ती आहेत. असाच शिल्पयुक्त खांब कृष्णाबाई मंदिरासमोरील काशीविश्वेश््वराच्या
दरवाजावर बसवला आहे. कोटात अशा शिला बर्याच असाव्यात. कोटातील सर्वांत महत्त्वाची
गोष्ट म्हणजे एक भव्य दगडी विहीर होय. (मुस्लिम अवशेषात तपशील आहेत.) कोट जरी पंतांचा असला तरी या बिहिरीमुळे त्याचा
काळ बहामनी युगापर्यंत तरी नक्कीच जातो. पण मुस्लिमांनी महाराष्ट्रात कोठलेच किल्ले
नव्याने बांधले नसल्यामुळे याचा काळ एकदम वाकाटक – शिलाहारापर्यंत जातो. या ठिकाणच्या
उत्खननात सापडलेल्या रोमनकालीन अबशेषांबरूनही याला पुष्टी मिळते.
पंतांच्या कोटासंबंधी असे सांगतात की हा किल्ला
बांधताना कोयनेचा ओघ बदलण्यात आला. कोयनेच्या जुन्या पुलापाशी आपल्याला या जुन्या पात्राच्या
खुणा दिसतात. गावात सापडणारी वीरगळाची ठिकाणे, मंगळवारातील जुन्या कऱ्हाड शहराचे अवशेष,
नदीच्या दोन्ही बाजूंच्या डगरीतील मातीच्या स्तरातील फरक, लक्ष्मीच्या मंदिराचे प्रतिबिंब
कोयनेत पडत असे अशी आख्यायिका असे काही पुरावे सांगितले जातात. पण असे नदीचे पात्र
संपूर्ण बदलण्याचे प्रयोजन काय असाबे हे समजत नाही. कोटाभोबती एक मोठा खंदक होता. आता
मात्र तो पूर्णपणे बुजला आहे. १८९६ मध्ये श्रीनिवास
पंतप्रतिनिधी यांच्या काळात कोटातील राजवाड्यात असलेली भबानी औंध येथे हलवण्यात आली.
त्याचे कारण कऱ्हाड येथील प्रतिनिधींचे ठिकाण औंधला गेले होते व केवळ उत्सवासाठी प्रतिनिधींना
कऱ्हाडला यावे लागे. कऱ्हाडच्या या भवानीची स्थापना औंधच्या राजवाड्यात खास मंडप बांधून
करण्यात आली व तिला कर््हाडदेवी असे म्हणण्यात येऊ.
Thanks for reading viral varta.