पुण्यासारख्या शहरामध्ये स्वतःचे घर असणे , हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण मेहनत करत असतो. या ब्लॉगमध्ये आपण आपल्या इन्कमनुसार पुण्याच्या कोणत्या भागामध्ये घर घेऊ शकतो हे बघणार आहोत. मुख्यत्वेकरून या ब्लॉगमध्ये आपण वेस्ट पुणे या भागाला टारगेट करून हा ब्लॉग बनवत आहोत.
पिंपरी चिंचवड मध्ये असे कोणते पाच एरिया आहे ज्या ठिकाणी एक सर्वसामान्य व्यक्ती अफोर्डेबल घर घेऊ शकतो ?
पिंपरी चिंचवड चा विचार करता पिंपरी चिंचवड मध्ये सगळ्यात जास्त घरे घेणारे जे लोक आहेत ते आहेत आयटी सेक्टर मधले आणि यानंतर येतात ते ऑटोमोबाईल सेक्टर मधले लोक.
आता पिंपरी चिंचवडचे जर विभाजन करायचं म्हटलं, तर आपला जो जुना पुणे-मुंबई हायवे आहे,त्याच्या पलीकडचा म्हणजेच भोसरी, मोशी, चाकण, आळंदी हा भाग ऑटोमोबाईल सेक्टर वाला पकडूया आणि जुना पुणे-मुंबई हायवे च्या अलीकडचा भाग म्हणजेच वाकड, किवळे, रावेत, पुनावळे, हिंजवडी बाणेर हा आयटी सेक्टर वाला भाग पकडूया. याचे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केले तर तुम्हाला असं समजेल की, गेली काही वर्षे आयटी सेक्टर वाला जो भाग आहे, तो जास्त प्रमाणावर वाढत आहे आणि ऑटोमोबाईल सेक्टर वाला भाग कमी प्रमाणावर वाढत आहे.
गेल्या तीन वर्षातला जर आपण डेटा काढला तर सर्वात जास्त फ्लॅट खरेदी ही पुणे वेस्ट म्हणजेच आयटी सेक्टर वाल्या भागामध्ये झाली आहे.
पिंपरी चिंचवड चा विचार करता , गेल्या ३ वर्षात, जवळपास 50 ते 60 टक्के फ्लॅटचे विक्री जी आहे ती पुणे वेस्ट म्हणजेच रावेत पुनावळे किवळे वाकड या भागामधूनच झाली आहे.
आता समजा आयटी सेक्टर मध्ये काम करणारा एखादा व्यक्ती घर घेऊ इच्छितो आणि त्याला हिंजवडी आयटी पार्क च्या 15 ते 20 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये घर हवे असेल तर सध्या अंडरडेव्हलप असणारे लोकेशन आणि येत्या काळात चांगल्या पद्धतीने ग्रोथ मिळेल असे लोकेशन म्हणजे रावेत, किवळे,मामुर्डी आणि गहुंजे, या भागांमध्ये वन बीएचके 40 लाखाच्या आसपास आणि टू बीएचके साधारणता 50 लाखापेक्षा अधिक किमतीला मिळू शकेल. येत्या काळामध्ये या भागामध्ये केलेले गुंतवणूक रियल इस्टेट क्षेत्रामध्ये ही एक चांगली गुंतवणूक ठरू शकते.
आता यामधील पुनावळे लोकेशन बद्दल बोलायचं झालं तर हिंजवडी पासून जवळ आणि अफोर्डेबल घर पुनावळे लोकेशन मध्ये मिळत होती पण गेल्या दोनच वर्षात या भागातील घरांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. 2021 साली पुनावळ्यामध्ये जो फ्लॅट 45 लाखाला मिळत होता तो आता 2025 मध्ये 60 ते 65 लाखापर्यंत गेला आहे, पुनावळ्याची हिंजवडी आयटी पार्कला असलेली कनेक्टिव्हिटी हेच या लोकेशनचे किमती वाढण्याचे मुख्य कारण आहे.
पुनावळे लोकेशन चा अंडरपास अतिशय छोटा असल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिकच्या समस्या खूप जास्त प्रमाणावर आहेत.
जर पुनावळेपेक्षा थोडे स्वस्त फ्लॅट पाहिजे असतील तर रावेत आणि किवळे हे तुमच्यासाठी चांगले ऑप्शन असू शकतात. रावेत बद्दल तुम्हाला माहितीच असेल किवळे लोकेशन सुद्धा पीसीएमसी मध्ये 2007 पासून आहे.
गहुंजे आणि मामुर्डी हे लोकेशन्स सध्या जरी मुख्य पुनावळे किंवा रावेत पासून थोडे बाहेर वाटत असले तरी येत्या काळामध्ये या भागामध्ये घरांच्या किमती नक्कीच वाढतील कारण या भागामध्ये पुण्यातील नामांकित बिल्डर जसे की लोधा कुमार कोलते प्रॉपर्टीज यांचे प्रोजेक्ट्स आहेत आणि डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर चालू आहे.
मामुर्डी आणि गहुंजे लोकेशन जवळून येत्या काळामध्ये रिंग रोड जाणार असल्यामुळे, रियल इस्टेट मार्केटमध्ये, या भागातील किमती वाढण्याचे मुख्य कारण हा रिंग रोड होऊ शकतो.