CRPF जवानाने लपून केले पाकिस्तानी महिलेशी लग्न, मुनीर अहमदच्या प्रेमप्रकरणाने सुरक्षा यंत्रणा ऐरणीवर

 केंद्रीय राखीव पोलिस दलाने (CRPF) पाकिस्तानी महिलेशी लग्न “लपवल्या”बद्दल जवान मुनीर अहमदला सेवेतून बडतर्फ केले आहे, कारण त्याचे कृत्य राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली.

या जवानाची शेवटची पोस्टिंग देशाच्या अंतर्गत सुरक्षा दलाच्या ४१ व्या अर्धसैनिक सीआरपीएफ बटालियनमध्ये झाली होती.

विनाचौकशी त्याला “सेवेतून काढून टाकण्यात आले”, असे अधिकृत सूत्रांनी पीटीआयला सांगितले.

मुनीर अहमद यांना पाकिस्तानी नागरिकाशी लग्न लपवून ठेवल्याबद्दल आणि जाणूनबुजून तिच्या व्हिसाच्या वैधतेपेक्षा जास्त काळ तिला आश्रय दिल्याबद्दल तात्काळ प्रभावाने सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.

त्याचे कृत्य सेना वर्तनाचे उल्लंघन करणारे आणि राष्ट्रीय सुरक्षेला हानिकारक असल्याचे आढळून आले,” असे सीआरपीएफचे प्रवक्ते उपमहानिरीक्षक (डीआयजी) एम दिनकरन म्हणाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले तेव्हा अहमदचा मेनल खानशी विवाह उघडकीस आला.

गेल्या वर्षी २४ मे रोजी व्हिडिओ कॉलद्वारे दोघांनी लग्न केले.

मुनीर अहमदने मेनल खानशी लग्न करण्यासाठी सीआरपीएफची परवानगी मागितली होती. तथापि, या संदर्भात निर्णय घेण्यापूर्वीच, दोघांनी गेल्या वर्षी २४ मे रोजी व्हिडिओ कॉलद्वारे लग्न केल्याचे वृत्त आहे.

सीआरपीएफच्या चौकशीत असे आढळून आले की जवानाने त्याच्या लग्नाची आणि भारतात तिच्या मुदतीपेक्षा जास्त काळ वास्तव्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली नव्हती.

२५ फेब्रुवारी रोजी मेनल खान टुरिस्ट व्हिसावर भारतात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिल्यानंतर, तिचा व्हिसा रद्द झाल्यानंतर ती निघून जाण्याच्या तयारीत होती. तथापि, १ मे रोजी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाने दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केल्यानंतर तिच्या हद्दपारीला स्थगिती दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top