Vasantgad and Sadashivgad Karad

 Vasantgad and Sadashivgad Karad

बसंतगड  :

कऱ्हाइहून चिपळूणला जाणाऱ्या ऐतिहासिक हमरस्त्यावर सुमारे कि. मी. अंतराबर बसंतगड हा परिबहन मंडळाचा थांबा आहे. तेथून उत्तरेकडे . कि.मी. वर बसंतगड (उंची ३०००) हा किल्ला आहे. पूर्वी हा थांबा श्रोत्रीवाडी या नावाने होता. कारण येथे गडाची वतनदार श्रोत्रीमंडळी राहत असत. या  गडावर गडाच्या उत्तरेला पुणेबंगळूर रस्त्यावर असलेल्या तळबीड या गाबातूनही जाता येते. तळबीड हे मोहित्यांचे गाव. शहाजीराजांची पत्नी तुकाबाई, शिवाजी महाराजांची पत्नी सोयराबाई राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई या सर्व मोहित्यांकडील. तळबीडच्या बाजूने सुरुवातीला सुमारे दीडशे पायर्‍या लागतात. पुढे मात्र काही नाही. गडाच्या शेजारी आणखी एक डोंगर असून त्याचा शेवट कऱ्हाडच्या दिशेला सुपने येथे होतो. या दोन डॉोंगरांमधून तळबीडची खिंड लागते. तर गडाच्या पश्‍चिमेलादेखील गडावरून एक उतार पुन्हा लगेच डोंगर सुरू होतो. या बेचक्यातच समथांची चंद्रगिरी ही घळ आहे.

 गडाच्या उत्तरेकडील तटबंदीच्या जरा खाली दोन मोठे बटबृक्ष शेजारी शेजारी उभे असलेले दिसतात. त्यामधूनच गडाची वाट जाते. गडाच्या तटबंदीशी असलेले प्रवेशद्वार एकदम लक्षात येत नाही. शत्रूच्या लक्षात येऊ नवे म्हणून दरबाजा एकदम समोर करता आतल्या बाजूला करतात. त्याला गोमुखपद्धत असे म्हणतात. आता या दरवाजाची प्रचंड पडझड झाली आहे. कारण हा दरबाजा इंग्रजांनी १३ मे १८१८ रोजी तोफांनी जमीनदोस्त करून टाकला. इंग्रज अंमलदार मनरो याच्या नाबाबर हे दुष्कृत्य आहे. पुढे गेले की बाजूला एका देवळीत श्री गजाननाची चार साडेचार फुटांची एक सुंदर मूर्ती दिसते. शिवकालीन गडाचे दुसरे आवडते दैवत म्हणजे उग्रस्वरूप हनुमान, त्याचीही देवळी गडाच्या दुसऱया दरवाजाजवळ म्हणजे नाईकबाजवळ आहे.  गडाच्या माथ्यावर आहे एक प्रचंड लंबगोलाकार मैदान. बाकडेतिकडेपणा नाही. मध्यभागी झाडीचा पुंजका. तेथे चंद्रसेन महाराजांचे मंदिर आहे. इकडे याला चंद्रोबाचांदोबा असेही म्हणतात.

मंदिराच्या भिंतीबर जीर्णोंध्दाराच्या
काही
नोंदी आढळतात. इतिहासाच्या त्या विराट मंचावरून बाद होऊन इतकी बर्षे झाली तरी हा किल्ला जिताजागता राहिला आहे. तो या चंद्रोबामुळेच. या पंचक्रोशीचे हे दैवतच आहे. देऊळ चांगले दगडी असून सभामंडप पण मोठा आहे. गाभाऱ्यात मात्र चांगलाच अंधार आहे. शेजारी वीरभद्र किंवा कोळेश्‍वराचे, तर समोर जरा खालच्या बाजूला रामाचे देऊळ आहे.
संपूर्ण पडक्या अवस्थेत असलेल्या या निव्वळ छपराला राममंदिर कसे म्हणावे ? या ठिकाणी
रामपंचायतनाच्या मूर्ती दोन वेळा बसवल्याचे दिसते. दोन्ही वेळच्या मूर्ती अलीकडीलच
पण अतिसुंदर आहेत. जुन्या भंगलेल्या मूर्ती शेजारीच खाली आहेत. तर नव्या चौथर्‍यावर
आहेत. त्याही पूर्णपणे छितन्रविच्छित्न झालेल्या दिसतात. गडावर जनावरांचा वावर मोठ्या
प्रमाणात आहे. त्यामुळे या मूर्तींना इजा झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. 

चंद्रोबा हा शूर्पणखेचा मुलगा. रावणाचा भाचा. खूप तपश्चर्या करून शिवाकडून
त्याने खड्ग प्राप्त करून घेतले. शेवटी लक्ष्मणाने त्याचे दोन्ही हात तोडले. सध्याच्या
चंद्रोबाच्या मूर्तीला दोन्ही हात अर्धेंच आहेत. मात्र शेजारील जी उत्सवमूर्ती आहे
ती मात्र पूर्ण हात असलेली आहे.  चंद्रोबाच्या
देवळासमोर पूर्वी एक प्रचंड दीपमाळ होती. ती पडली. व तेथे आता तिचे दोन तुकडे छान उभे
आहेत. चैत्र वद्य एकादशीला चेंद्रोबाची जत्रा भरते. या दोहोदरम्यान एक लहानसे शिबमंदिरपण
आहे.  गड़ाचा जो प्रचंड माथा आहे, त्याच्या
भोवती काळीभोर भिंतीवजा नैसर्गिक अशी उंच तटबंदी आहे. त्यावर आवश्यक तेथे बांधकाम करून
ते भक्कम केले आहे. त्यामुळे या बांधकामाच्या रूंदीची पायवाट सर्व तटबंदीवर तयार झाली
आहे.

तटबंदीवर एकूण चार मोठे बुरूजआहेत. त्यापैकी पूर्व व पश्‍चिमेकडील बुरूज चांगल्या
अवस्थेत आहेत. पश्‍चिम बुरूजावर चढण्यासाठी जिनादेखील आहे. औरंगजेबाचा सरदार मुखलिसखान
याच्या पत्रातील उद्लेखाप्रमाणे गडावर एकूण बारा बुरूज ब तीन बिहिरी होत्या.  गडाला दोन दरबाजे आहेत. दोन्हीही गडाच्या उत्तरेला
म्हणजे तळबीडच्या बाजूला आहेत. त्यातील तळबीड दरवाजा पूर्व भागात आहे तर पश्‍चिम भागात
नाईकबा दरबाजा आहे. हा दखाजा चांगला भव्य आहे. या दरवाजापुढे अर्धवर्तुळाकार भिंत आहे.
याही दरवाजाची प्रचंड पडझड झाली ब त्याचे अवशेष जवळच पडलेले दिसतात.

गडाच्या दक्षिणणेला कऱ्हाडहून कोकणात जाणारा प्राचीन रस्ता त्यापलीकडे कोयना नदी आहे. याच बाजूला समोरच आगाशिबाची हीनयानपंथीय लेणी आहेत. त्यामुळे या परिसराला मुसलमानपूर्व काळात देखील महत्त्व होते. शिवाय या काळातदेखील शेजारचे कऱ्हाड हे सुभा म्हणून नव्हे तर राजधानीचे ठिकाण म्हणून महत्त्व पावले होते. आणि म्हणूनच वसंतगड, दातेगड (सुंदरगड), मोरगिरी (गुणवंतगड), भैरवगड अशा संरक्षक किल्ल्यांची रांगच या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आहे.

 त्याबरून काही ठिकाणी उद्लेख केल्याप्रमाणेच हा गड शबाजी महाराजांनी बांधला नसावा. दुसरे असे की अफजलखानाचा बध झाल्यानंतर महाराजांनी पन्हाळ्यापर्यंत एक बादळस्वारी काढली, त्याबेळी त्यांनी बसंतगड घेतल्याचा उल्लेख आहे. तो महाराजांनीच बांधला असता तर स्वराज्याचा सुरवातीच्याच काळात आदिलज्ञाहीकडून का घ्यावा लागला असता? तेव्हा हा किल्ला शिवकालापूर्वीच भोज शिलाहार यापैकी कोणीतरी निर्माण केला असावा. औरंगजेबाने  त्यावेळी त्याचे किलीफतेह असे नाव ठेवले होते.  गडाबर पूर्वी चांगल्या मोठ्या अशा दहाबारा तोफा होत्या. आता तेथे काही नाही. पूर्वी गडावरून एक तार पार तळापर्यंत टाकलेली असायची. गबताच्या भाराचा हुक या तारेला लावला की तो आपोआप खाली जाई.  सध्या गडाबर कृष्ण कोयना या नाबाची दोन लहानशी तळी आहेत.

सदाशिवगड  :

कऱ्हाडपासून पूर्वेला सुमारे . कि.मी.वर ओगलेवाडी आहे.या ओगलेवाडीच्या दक्षिणेला सदाशिवगड आहे. या गडाचा डोंगर येथूनच सुरू होतो. तो जबळजबळ कुंडलपर्यंत तसाच जातो. कऱ्हाडहून पूर्ववाहिनी झालेली कृष्णानदी येथूनच दक्षिणबाहिनी होते ती या डोंगराच्याच अंगाने खाली जाते.  गडाची उंची सुमारे ३००० ते ३५०० फूट एवढी असून चढही बराच उभट आहे. किल्ल्याच्या जीर्णोध्दार समितीने अगदी बरपर्यंत पायऱ्या बांधून काढल्या आहेत वरपर्यंत वीजेच्या दिव्याची पण सोय केली आहे. गडाच्या माथ्यावरून चह्कडील कृष्णा खोऱ्याच्या रम्य परसिर दृष्टिपथात येतो.

माथ्यावर प्रचंड आकाराची सपाटी असून मधोमध महादेवाचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंदिरही आता चांगल्यापैकी बांधले आहे. मूळचे दगडी बांधकाम छोटेखानी असून पुढील सभामंडप नंतर बांधलेला आहे. त्यामुळे येथे दोन नंदी आढळतात. गाभाऱ्यात महादेवाची पिंड असून वैशिष्ट्य म्हणजे तेथेच हनुमंताची मूर्तीपण आहे. गाभाऱ्यावर भव्य घुमट असून तो आतून अशदशकोनी आहे. मंदिराच्या प्रांगणात भली मोठी बांधीव विहीर आहे. गडाबर पाण्याची टा्त्रे बरीच असावीत. असे एक टाके पश्‍चिम टोकाला आहे.

श्रावणात येथे खूप गर्दी असते आणि महाशिवरात्रीला भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो.  गडावर इतरत्र कोठेही ऐतिहासिक अवशेष आढळत नाही. पण या गडाच्या आसपास हजारमाची, बाबरमाची, राजमाची वनवासमाची अशा चार माच्या आहेत. आज त्या नागरी बस्तीने गिळून टाकल्या आहेत. त्यातील हजारमाची ही ओगलेवाडीत किल्ल्याच्या पायथ्याशीच असून तेथून चढाच्या पायऱ्या आहेत. या माच्यावरून हा किल्ला होता हे नककी. शिबाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्यात सदाशिबगडाचे नाव आहे. याचे क्षेत्रफळ २३ एकर असून १८६२ मध्ये हा किल्ला उद्ध्वस्त, पडक्या स्थितीत होता असा उद्लेख गो. रा. माटे यांनी आपल्या सातारा जिल्ह्यावरील पुस्तकात केला आहे.

कऱ्हाड शहराभोवती मजबूत तट भुईकोट किल्ल्याभोवती खंदक होता. हा खंदक अर्थातच किल्ल्याच्या गावाकडील भागात म्हणजे पूर्वेकडील बालाजी मंदिराच्या आसपास होता. नगरपालिका शतसांबत्सरिक ग्रंथातील . . १८७६७२ मधील पेठांच्या हद्दी दिल्या आहेत. त्यातील उल्लेख असाशनिबार पेठदक्षिणेकडील खंदकाच्या पलीकडील भाग. गुरूवार पेठचावडीवरून मंगळवार वेशीपर्यंत शुक्रवार पेठदाभोळ दरबाजाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत त्याच्या पश्‍चिमेकडील बस्ती. मंगळबार पेठ
– बेशीबाहेरील बस्ती  *साहित्यिक कऱ्हाड’ मध्ये
गवळवेस, रंगारवेस, मसूरवेस, दाभोळ दरवाजा, ब्राह्मणवेस, बुधवार पेठबेस, मंगळबार पेठ
बेस, गाडी उतार बेस असे उल्लेख आहेत. 

अतिप्राचीन करहाटक म्हणजे आजच्या मंगळवारपेठेपासून खाली टेंभूपर्यत ब दक्षिणेकडील
निमजग्याच्या माळापर्यंतचा भाग होय. या भागात प्रागैतिहासिक काळातील नाणी, पाटे, जाती,
टेरेकोटे, शिक्के अशा कितीतरी गोष्टींचा संग्रह कन्हाडमधील इतिहासप्रेमी संशोधक भगवानराव
घारगे यांनी केला होता. त्याचप्रमाणे पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळाने पंताच्या
कोटात १९४८-४९ मध्ये उत्खनन केले होते. त्यांनाही मातीच्या भांड्याचे तुकडे, मणी, दगड,
शिंपा लोखंड हाडे यांच्यापासून बनवलेल्या वस्तू, बांगड्या, टेरेकोटा, नाणी, रोमन नाण्याच्या
प्रतिकृती अशा वस्तू सापडल्या. त्या इ. स. पू. २रेतेइ. स. २ रे शतक या काळातल्या असाव्यात.

Thanks for reading viral varta, Keep reading viral varta.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top