Karad History
जैन अवशेष:
आजच्या कऱ्हाइमध्ये जैन अवशेष नाहीत. हाटकेश्वराच्या देबळाजवळील एका नक्षीकामाच्या दगडाचा उल्लेख य. रा. गुप्ते करतात. त्याबरील मूर्ती जैनांच्या होत्या व त्याचा काळ ७०० ते ९०० हा असावा. याशिवाय त्यांना कोटाखाली १० व्या शतकातील २–३ दिगंबर जैनांच्या मूर्तीपण मिळाल्या. जखिणबाडीला पण अशीच एक दिगंबर जैनाची मूर्ती त्यांना दिसली ब तिचे छायाचित्र त्यांनी घेतले. भारत इतिहास संशोधक मंडळात पण कऱ्हाडात सापडलेला पुसट लेख ब त्याबर जैनप्रतिमा असलेला दगड आहे.
हिंदू अवशेष:
कऱ्हाड शहरातील प्राचीन म्हणून जी देवळे समजली जातात, ती शिव किंवा शंकर या देवतेची आहेत. त्याची संगती अशी असावी. आर्वपूर्व काळात जी आदिम संस्कृती या भागात होती, तिचे दैवत शैव हे असावे. या संबंधीचे विवेचन द. ग. गोडसे यांनी आपल्या ‘शक्तिसौष्ठव‘ या ग्रंथात फार चांगले केले आहे. दुसरे असे की बौध्दधर्माच्या पाडावानंतर या भागात शैवांचा प्रभाव वाढला असावा. आगाशिव धरून अनेक
लेण्यांत हिंदूंनी शंकराची पिंडी स्थापन केली. वर उल्लेख केलेले रुद्रेशवराचे उदाहरणही
लक्षणीय आहे. यामुळेच कऱ्हाडमधील हाटकेश्वर, रत्नेश्वर, काशीविश्वेश्वर, कपिलेश्वर,
पावकेश्वर, आनंदेश्वर ही प्राचीन देवालये शंकराचीच आहेत. मात्र ती जशी पूर्वी होती
तशी आज नाहीत. त्यांचा अनेकबेळा जीणोंध्दार झालेला आहे. त्यातील काहींच्या तारखाही
उपलब्ध आहेत. मात्र हिंदूधर्मातील मंदिर ही कल्पनाच ५ व्या किंवा ६ व्या शतकानंतरच्या
काळातील सल्यामुळे ही मंदिरे त्यानंतरच्या काळातील असाबीत. त्यापैकी पाबकेश्बर हे
सैदापूरला म्हणजे संगमापलीकडे आहे. त्याची हेमाडपंती बांधणी त्याचे प्राचीनत्व दाखबून
देते. हाटकेश्वर तसे ग्रामदैवत व म्हणून प्राचीन, पण त्याचे स्थलांतर झालेले असावे.
त्यातूनही आजच्या
हाटकेश्वराचा गाभारा हा पुढील मंदिरापेक्षा जुना म्हणजे शिवकालीन असावा. भाट्यांच्या मळीत असलेले रत्नेशवर हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण
आहे. या देवळाचा गाभारा ब मंडप हे हेमाडपंती असून बरचे शिखर मात्र पेशवाईतील आहे. मंदिराला
मुस्लिम पध्दतीचे चार मिनार आहेत. मध्ये नेहमीच्या पध्दतीने शंखाकृती निमुळते शिखर
आहे. या मिनारामध्ये जी शिल्ये आहेत त्यामध्ये बरती हत्ती आहे. हत्ती असणे हे दुर्मिळ
आहे. मिनार हा मुस्लिम स्थापत्याचा प्रभाव किंवा मंदिराच्या बचावाची तरतूद असावी.
संगमेश्वराचे देऊळ
संगमावरच आहे. देऊळ सामान्यच आहे. १९७६ च्या पुरानंतर या देवालयाचा काही भाग तसेच काही
भाग तसेच पुरापासून नुकसान होऊ नवे म्हणून जी तटबंदी बांधली होती ती वर आली. त्यावरून
हे देऊळ मूळचे बरेच मोठे असावे असे बाटते.
यया संगमेश्वराच्या देवळाजवळ एक लहान रामाचे देऊळ आहे. त्यातील मूर्ती या देखण्या
असून शिलाहार काळातील असाव्यात असे वाटते. या साध्या देवळात या मूर्ती कशा आल्या याचे
आश्चर्य बाटते. यातील लक्ष्मणाची उभे राहण्याची पध्दत लक्षात घेण्यासारखी आहे. प्राचीनकाळी शिवाखालोखाल शक्तीची उपासना होत होती
व म्हणून लक्ष्मी ब भवानी यांची मंदिरे मोठ्या संख्येने होती. एस. टी. स्टॅडच्यामागे
निमजग्याच्या माळाबर असेच लक्ष्मीचे भव्य देऊळ होते. आज या महालक्ष्मीच्या प्रचंड मंदिराचा
चौथरा तेबढा शिल्लक राहिला आहे. या मंदिरातील मूर्ती तेवढीच भव्य असली पाहिजे. ती काही
उपलब्ध नाही. पण याच मंदिरातील महिषासुरमर्दिनी स्वरूपातील देवीची लहान मूर्ती मात्र
भ्ैरोबागल्लीत उत्तराल्ष्मीच्या देवळात स्थापिली आहे.
सोमवार पेठेतील उत्तरालक्ष्मीचे देऊळ १७२७ मध्ये
बांधले. या देवालयातील मूर्तीच्याखाली भुयारबजा खोली आहे. देवीची सुरक्षितता हाच या
भुयाराचा हेतू असावा. देवीची मूर्ती अतिशय सुंदर असून तिचा काळ ब कोल्हापूरच्या महालक्ष्मी
मंदिराचा काळ म्हणजे १२ वे ते १३ वे शतक हा असावा. देबी महिषासुराचा बध करताना दाखवली
आहे. मूर्तीला तीन भंग म्हणजे बाक आहेत. हेच मूततींच्या प्राचीनत्वाचे मुख्य लक्षण
आहे. साधारणपणे ३१ इंच उंच ब १६ इंच रूंद एवढीच ही प्रतिमा आहे. पण ही मूर्ती प्राचीन
ग्रंथांत सांगितल्याप्रमाणे पूर्ण शास्त्रीय पध्दतीने घडवली आहे. कऱ्हाड शहरातील इतर अनेक मंदिरांतील मूर्ती या प्राचीन
आहेत. पण त्यांचा उल्लेख धार्मिक या भागात केलाच आहे. बीरगळ म्हणजे प्राचीन पध्दतीने केलेली युध्दात धारातीर्थी
पडलेल्या बीरांची स्मारके. त्यावरून आपल्याला तत्कालीन पोषाख, शस्त्रास्त्रे यांची
माहिती समजते. बीरगळ हे सामान्यत: गाबाच्या सीमेबर उभारले जातात.
कऱ्हाडमधील आज लक्षात
येणारे वीरगळ म्हणजे कोटाच्या पाणदरवाजाजवळील बुरुजाच्या भिंतीतील ब कृष्णाबाई घाटावरील
दीपमाळेजबळील हे होत. याशिबाय पूर्वी कन्याशाळेसमोर, बुधवारात ठिकठिकाणी वीरगळ होते
पण आता ते तेथे नाहीत. कऱ्हाडातील वीरगळांची संख्या दीडदोनशे एवढी असावी.
इतर:
घाटावर
व कोटाखालील गणपतीजबळ नागप्रतिमा आहेत. कोटातील
भवानीच्या देवळात भवानीचे जे आसन आहे ते ९ते ११ व्या शतकातील असावे. त्याबर ज्या तीन
मूर्ती आहेत त्यातील एक बुध्दाची असावी असे वाटते. घाटावरील विश्वेश्वराच्या मंदिराच्या
दरवाजावर दोन उभे ब एक आडवा खांब आहे. त्यावरील शिल्पे अत्यंत सुरेख असून ती प्राचीन
शिल्पांपैकीच आहेत. कोटाखालील गणपतीचे देऊळ
तसे अलीकड़ील आहे. पण त्यातील गणपतीची मूर्ती ही निमजम्याच्या माळावरील लक्ष्मीमंदिराच्या
प्रवेशद्वारावरील गणेशपट्टीवरील होती असे सांगितले जाते. गणेश अंताजी जोशी यांनी खरेदी केलेल्या घरातून उत्तर
गुप्तकालीन धर्तीच्या नक्षीचे सातव्या शतकातील दोन दगड य. रा. गुप्ते यांना सापडले
ते त्यांनी नेले. काझींच्या जमिनीत सुमारे
९ व्या शतकातील एका लहान पण सुंदर देवळाचे अवशेष गुप्ते यांना मिळाले. एकाबर गंगायमुनांच्या
प्रतिमांच्या धतींवर मूर्ती खोदलेल्या आहेत. मंगळवार वेशीजवळ खंडित मूर्ती असलेला एक
दगड पायामध्ये सापडला.
त्यावर एका बाजूस नंदीवर शंकरपार्वती बसल्याचा तर
दुसर्या बाजूस ती सिंहासनावर आरूढ झाल्याचे दाखवले आहे. कोटातील पाणदरवाजाजवळ खंडित
मूर्तींचा दगड पायात लागला होता. तो १२ ब्या-१३ व्या शतकातील असून औंध येथे पाठवण्यात
आला. १९२६ मध्ये गिजरे यांना कार्तिकेयाची सुंदर मूर्ती कोरलेला महिरपीचा एक काळा दगड
सापडला होता. सुप्रसिध्द दोन मनोऱयांमधील १२-१३ व्या शतकातील एका खांबाचा उल्लेख गुप्ते
आपल्या पुस्तकात करतात. काजींच्या जमिनीपलीकडील उंचवट्यावर समारे १२ व्या शतकातील महिरप
कोरलेला एक संगमरवरी दगड एका कोळ्यास सापडला.
पूर्वीच्या शनिवारवेशीच्या
बाहेर असलेल्या देवळातील गणपती हा १२-६३ व्या शतकातील असावा. १२ ते १४ शतकातील काही बिच्छिन्न प्रतिमा कृष्णेच्या
पात्रात टाकल्या तर काही देवळाच्या पायात घालण्यात आल्या. (गुप्ते) मंगळवार पेठेत टिळक
हायस्कूलजवळ क्षत्रपांची काही नाणी सापडली. तेथे सापडलेले इमारतींचे पाये हे क्षत्रपकालीन
नसून ते शिलाहारांच्या राजवाड्याचे असावेत असे डॉ. भांडारकर यांचे मत आहे. लंगर मशिदीच्या आसपास मडकी, विटा, नाणी इत्यादी
अवशेष मिळाले. ते १३-१४ शतकातील असावेत. १९४८-४९ मध्ये पुण्याच्या भारत इतिहास संशोधन
मंडळाने पंताच्या कोटात उत्खनन केले होते. त्यांनाही नदीजवळ वर्तुळाकार विहिरी , मातीची
भांडी, मणी, दगडी ब लोखंडी वस्तू, नाणी टेरेकोटा वगैरे बस्तू सापडल्या होत्या. एस.
टी. स्टँडजवळील बिरोबा देऊळ हे पंधराव्या शतकातील हेमाडपंती मंदिराच्या अवशेषावर बांधले
आहे. संत सखूच्या देवळाला लागून जुना मंडप व धर्मशाळा होती. त्या १९२६ च्या सुमारास
पडल्या.
भाळवणी शिलालेख:
भाळवणी, ता. खानापूर जि. सांगली येथे कऱ्हाडच्या
श्री शिवाजी विद्यालयाचे शिक्षक भगवानराव घार्गे यांना चार शिलालेख उपलब्ध झाले. (महाराष्ट्र
टाईम्स, २६-६-१९७१) महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व ब पुराभिलेख विभागाचे तत्कालीन
संचालक वि. गो. खोबरेकर बांनी बा शिलालेखाचे ठसे काढून नागपूरचे विदवान इतिहास संशोधक
डॉ. वि. भि. कोलते यांना पाठविले होते.
“आपल्या
महाराष्ट्रातील काही ताम्रपट ब शिलालेख’ या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळाने १९८७ मध्ये प्रकाशित केलेल्या ग्रंथात या शिलालेखाबर डॉ. कोलते यांचा एक लेख
आहे. उपरनिर्दिश्ट चार शिलालेखांपैकी एक देवनागरी
लिपीतील संस्कृत भाषेत आहे. तथापि शेवटच्या काही ओळींतील शब्दांवरून तो मराठीत असावा.
शिळा ३९ सेंमी उंच ब ३० सेंमी रूंद असून प्रत्येक ओळीत १७ ते १८ अक्षरे अशा एकूण १५
ओळी त्या शिळेवर आहेत. शिलालेखावर धात्री संवत्सर वैशाख शु ३ गुरुवार शके ११३८ (म्हणजे
इ. स. ता. २१ एप्रिल १२१६) असा कालनिर्देश आहे.
हा लेख द्वितीय सिंघणदेवाच्या राज्यकालातील, पण तो
त्याच्या अधिकाऱ्याचा आहे. कऱ्हाड मंडळात श्री पदुमण ऐडि, चैय्यण देव ब श्री सोईदेव
हे सिंघणाचे अधिकारी होते, त्यांच्या उपस्थितीत भाईदेवाच्या मांगलिक पूजेसाठी काही
राज्यवृत्ती दिल्याची ही नोंद असावी.
Thanks for reading Viral Varta Blog!