Historical Information about Karad

 

ऐतिहासिक कऱ्हाड :

    हिंदू संस्कृतीच्या लोकांची बसाहत कृष्णा नदीच्या परिसरात आंध्र प्रदेशाकडून प्रथम बाढत जाऊन ती कृष्णेच्या उगमापर्यंत येऊन पोहोचली असे पुरातत्त्व संशोधक प्रा. डॉ. . धी. सांकलिया यांचे मत आहे.  इसबीसन पूर्व तिसरे ते इसवी सन आठशे या अकरा शतकांच्या काळात कऱ्हाड हे नगर राजकीय आणि सांस्कृतिकटृष्ट्या समृद्धीच्या शिखरावर असून पश्‍चिम महाराष्ट्राची राजधानी होती.  कल्याणी येथील चालुक्य राजांच्या, तसेच यादवांच्या शिलालेखात या नगराच्या परिसरातील प्रदेशाचा निर्देश अनुक्रमे *करहाट४००० आणि *करऱहाड* २००० या नावानी आढळतो. फ्लीट यांच्या मते चालुक्यकालीन करहाट४००० देशवबिभाग सध्याचा सातारा जिल्हा आणि भूतपूर्वकालीन भोर आणि फलटण या संस्थानांचा काही भाग मिळून बनलेला असून त्याची दक्षिण सरहद्द कृष्णा नदीने आणि उत्तर सरहद्दप्रत्यंडक॑ ४००० (सध्याचे फलटण) देशाने बनली होती.

     डॉ. सांकलिया यांच्या मते यादवकालीनकरहाड* २००० या देशविभागात सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, विटे, तासगाव, खरसुंडी तालुके, सांगली जिल्ह्यातील मिरज सांगली तालुके बेळगाव जिल्ह्यातील अथणी या तालुक्यांचा समावेश होत असे. (. . डॉ सिध्देश्‍्वरशास्त्री चित्राव, प्राचीन भारतीय स्थलकोश)  कोठल्याही शहरात ज्या प्रमाणात ज्या काळातील ऐतिहासिक अवशेष सापडतील त्या प्रमाणात त्या स्थळाचे ऐतिहासिक प्राचीनत्व सुसंगत रीतीने  सिध्द होते. काही प्रमाणात हे अवशेष लिखित साधनांपेक्षादेखील
महत्त्वाचे ठरतात कारण वर्तमानकाळाला जोडणारे ते दुवेच असतात. इत्तर उद्लेख केल्याप्रमाणे कऱ्हाड नगरी ही प्राचीन आहे त्या दृष्टीने याही शहरात वास्तू, मंदिरे, मूर्ती, वस्तू, शिलालेख, नाणी, ताम्रपट यांच्या रूपाने असंख्य अवशेष आहेत. यामधील मंदिरांचा आढावा स्वतंत्रपणे घेतला आहेच. या ठिकाणी प्रामुख्याने वास्तुरूपाने जे अबशेष आहेत त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  कऱ्हाड शहरातील अवशेषांचे साधारणपणे चार गट पाडता येतील.

. बौध्द जैन अवशेष .

. हिंदू अवशेष.

. मुस्लिम अवशेष.

. सामाजिक अवशेष.

बौध्द जैन अवशेष :

     कऱ्हाडच्या आसपासचे सर्वांत प्राचीन अवशेष म्हणजे आगाशिव जखिणबाडीची बौध्द लेणी ही होत. संसार हा दुःखस्वरूप असल्याने त्याचा त्याग जेबढा लबकर करता येईल तेबढे चांगले या भूमिकेतून अनेक बौध्दधमीय संन्यास घेत असत. यांना भिख्खू किंवा श्रमण असे म्हणत. तसेच या भिख्खूंना एकाच ठिकाणी राहणे बर्ज्य असल्याने ते सारखे भ्रमण करत असत. पण पावसाळ्यात मात्र त्यांना एकाच ठिकाणी मुक्काम करणे आवश्यक होई. त्यासाठी वस्तीपासून दूर पण हमरस्त्याजबळ ते आपली राहण्याची व्यवस्था डोंगरातील गुहांमधून करत. जेथे गुहा नसतील तेथे त्या खोदल्या जात. लेण्यांची सुरबात हीच होय. यामुळेच महाराष्ट्रातील बहुतेक लेणी ही महत्त्वाच्या हमरस्त्यावर आहेत.

    कऱ्हाडहून कोकणात जाणारा इस्ता हा प्राचीन काळापासून महत्त्वाचा आहे. त्यामुळेच ही कऱ्हाडजबळील लेणी निर्माण झाली आहेत. याच रस्त्याच्या संरक्षणासाठी कऱ्हाडपासून अगदी कोकणापर्यंत संरक्षक किल्ल्यांची साखळी आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे. कर्‍हाडच्या दक्षिणेला आगाशिवाचा डोंगर आहे. या डोंगराच्या सर्वात उंच जागी शंकराचे देऊळ आहे. त्यालाच आगाशिव असे म्हणतात.

     या जागेपासून पूर्वेकडे जो डोंगर जातो त्याच्या दोन्ही बाजूंना लेण्यांचे पुंजके आहेत. त्यापैकी दक्षिण बाजूचा जो गट आहे त्याला जखिणवाडीची लेणी असे म्हणतात. कारण याच्या पायथ्याशी जखिणवाड़ी म्हणजे प्राचीन काळातील वक्षिणवाटिका हे गाव आहे. बौध्द धर्मात संरक्षक देवता म्हणून यक्ष यक्षिणी यांना खूप महत्त्व आहे. कदाचित या लेण्यांमुळेच ते गाव बसले असण्याची शक्‍यता आहे. डॉंगराच्या उत्तरेच्या बाजूला पण एक लेण्यांचा गट आहे. 

    या लेण्यांची दखल अगदी प्रथम . . १८४९ मध्ये सर बार्टल फ्रेअर॒यांनी घेतली. त्यांनी या सर्व लेण्यांना तीन गटांत विभागले. पहिला गट दक्षिणेकडील जखिणवाडीचा. यामध्ये एकूण २३ गुहा येतात. त्यानंतर डोंगराच्या उत्तरेकडील उतारावरील १९ गुहांचा दुसरा गट तिसरा कोयनेच्या खोऱ्याकडे तोंड करून असलेला २२ विखुरलेल्या गुहांचा अशा या एकूण ६४ गुहा म्हणजे लेणी आहेत. याशिवाय इतर बारीकसारीक अर्धवट खोदकाम आहेच. यामुळे एकूण संख्येबाबत भिन्नता दिसून येते.  ही लेणी तशी सामान्यच आहेत. कार्लेभाज्यासारखी शिल्पसमृध्दता येथे नाही. त्याची तीन कारणे असावीत. एक समृध्द लेण्यांना योग्य असा दगड येथे नाही. दोन, ही लेणी हीनयानपंथीयांची किंवा बौध्दधर्माच्या सुरुवातीच्या कालखंडातील असल्याने शिल्पांची विपुलता त्याकाळच्या बौध्द धर्माला मान्य नव्हती. आणि तिसरे कारण या भागातून बौध्द धर्माचे उच्चाटन झाल्यामुळे त्यांची बाढच थांबली असावी.

     ही लेणी हीनपंथीयांची आहेत याचे पुरावे पुढीलप्रमाणे आहेत. . मोठ्या हॉलमध्ये खांब नसणे. . खोदकामातील ओबडधोबडपणा. . चैत्यांचे विशिष्ट स्वरूप . सर्व गुहांमध्ये असलेला शिल्यांचा जवळजवळ अभाव. साधारणपणे बौध्द लेण्यांमध्ये विहार म्हणजे भिक्षुंच्या राहण्याची व्यवस्था, चैत्यगृह म्हणजे त्यांच्या उपासनेची किंबा प्रार्थनेची जागा असे दोन भाग असतात. या दोन्हींपुढे बहुतेक वेळा मोकळी जागा पाषाणातीलच असते. तर काही ठिकाणी मध्ये असलेल्या मोकळ्या जागेभोवती ओवऱ्या पण काढलेल्या असतात. अशा ओबऱ्या बिहार चैत्य या दोन्ही ठिकाणी असतात. कऱ्हाड येथील लेण्यांत अशा विविध प्रकारच्या गुहा अर्थात लहान स्वरूपात आढळतात.

    येथे भव्य म्हणता येईल असे एकही लेणे नाही. बहुतेक गुहांच्या प्रवेशद्वाराजवळ एक व्हरांडा, मग उभे खांब नंतर हॉल अशी रचना आहे. या हॉलमध्ये किंबा अगदी सुरुबातीलादेखील दगडी बाके कोरली आहेत. काही ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ दगडातच काढलेल्या खिडक्याही आढळतात. काही लेणी चैत्याच्या स्बरूपात आहेत. त्यामध्ये जरा मागच्या बाजूला स्तूप आहे. स्तूप म्हणजे एक प्रकारे बुध्दाच्या अबशेषाबरील स्मारकेच असत. जमिनीलगत बर्तुळाकार बैठक, तीवर अंडाकृती घुमट, त्यावर चौकोनी हार्मिका म्हणजे अवशेष ठेवलेली पेटी आणि टोकावर घुमट अशी स्तुपाची रचना असते.

    जखिणबाडी येथील पाचव्या क्रमांकाचे लेणे या दृष्टीने प्रेक्षणीय आहे. प्राचीन काळी चैत्याच्या सुरक्षिततेसाठी छताला तुळया बसवल्या जात. लाकडी असल्याने कालांतराने त्या नष्ट झाल्या. (कार्ल्यांच्या लेण्यांत अशा तुळया अजूनही आहेत.) पण त्यासाठी केलेल्या खोबण्या मागे राहतात. या पाच क्रमांकाच्या लेण्यात दगडात केलेल्या खोबण्या दिसतात. स्तुपाच्या पाबाबरील अ्ाँड, हर्मिका, छत्रदंड छत्र असून हर्मिकेवर वेदिकेची नक्षी आहे. छत्रदंड तुटलेल्या अवस्थेत आहे. बुध्दाचे सिंह हे प्रतीक असते तर धर्माचे धर्मचक्र बुध्दाच्या महापरिनिवांणाचे स्तूप हे प्रतीक या चैत्यगृहातील स्तुपावर आढळून येतात. या सर्व लेण्यांत बुध्दमूर्ती कोठेही नाही. कोयनेच्या बाजूला एका लेण्यात तीन मानवी शिल्पे आहेत. ही शिल्पे कार्ला, भेडसा येथील शिल्पासारखीच आहेत.

     मानबी आकार अस्पष्ट असले तरी त्यांची बस नेसण्याची पध्दत डोक्यावरील पागोटे स्पष्ट दिसते. दगडाच्या ठिसूळपणामुळे त्यावरील लेख टिकून राहणे अवघडच. पण दोन लेख आपले अस्तित्व दाखवून देतात. एक लेख असा – ‘गोपालपुतस संघमितरस लेण देवधमम्हणजे गोपालाचा पुत्र संघमित्र याची धार्मिक देणगी अथवा याचा दानधर्म म्हणजे हे लेणे होय. म्हणजे कऱ्हाडच्या व्यापाऱ्यांनी जशी बारहुतसारख्या दूरदूरच्या लेण्यांना मदत केली तशीच आपल्या गावच्या लेण्यालाही केली. संघामित्र हा कऱ्हाडचा किंवा आसपासचा असावा. दुसरा लेख पहिल्याहूनही अस्पष्ट आहे. ध्रमरखितस देव (धम) धर्मरक्षितस्य देवधर्म म्हणजे धर्मरक्षिताची देणगी. पहिली अक्षरे गेल्यामुळे नाब काय होते हे कळत नाही. सातारा गॅझेटियर या पुस्तकाचे कते फर्ग्युसन यांच्या मताप्रमाणे ही लेणी इसवी सनाच्या पहिल्या शतकातील असावीत.  सातारा जिल्ह्याच्या गँझेटियरमध्ये म्हटले आहे की, ६४ लेण्यांशिवाय इतरत्रही काही खोदकाम आहे.

    अगदी अलीकडे आगाशिव डोंगराच्या पश्‍चिमेला असलेल्या डोंगराच्या बाजूला काही लेणी नव्याने सापडली आहेत. ही लेणी मातीने पूर्ण बुजून गेली होती. पण आता पुरातत्त्व खात्याने ही लेणी स्वच्छ मोकळी केली आहेत. ही लेणी एकूण चार आहेत नजीकच्या जखिणवाडी आगाशिबा या गटाप्रमाणेच आहेत. एक चैत्य तीन बिहार आहेत. चैत्य असूनही स्तुपामध्ये हर्मिका, त्यावरील अर्धांड, छत्रदंड छत्र दिसत नाही. बेथील दगड हा कच्चा असल्याने एकतर लेण्यांचे नुकसान झीजेने झाले असावे किंबा लेणीच अर्धबट सोडली असण्याची शक्‍यता आहे.  आतापर्यंत कऱ्हाड येथे फक्त कोयनेच्या दक्षिणेला असलेल्या डोंगरातच लेणी असल्याचा समज होता. पण कोयनेच्या उत्तरेला बनबासमाची या गावाजवळ प्रा. का. धों. देशपांडे यांना असेच एक लेणे सापडले आहे. एकाच खोलीचे हे लेणे आहे. सुरवातीला व्हरांडा, मग खांब, आत मोकळी जागा असे या बिहाराचे नेहमीचे स्वरूप आहे.

     ही लेणी कऱ्हाडच्या जबळ आहेत. पण खुद्द शहरात कोठेही बौध्द अवशेष नाहीत किंवा तसे असल्याचा उल्लेख नाही. कोटाखालील बालाजीच्या देवळाजबळ रुद्रेश्वर नावाचे शंकराचे देऊळ आहे. या देवळात शंकराची पिंडी आहे. त्यावरी शाळुंकी
म्हणजे बुध्दाचे मस्तक आहे. या मस्तकाचे तोंड पूर्वेस आहे. कानाच्या पाळ्या, त्यावरील
आभूषणे स्पष्ट दिसतात. चेहऱ्याची मोडतोड झालेली आहे. डोक्यावर जे कुरळे केस आहेत ते
स्द्रासारखे दिसतात. मस्तकाच्या आकारावरून ही मूर्ती ६-७ फूट उंच असावी. शहरातील हा
एकमेव बौध्द अवशेष असावा.

     कै. गुप्ते बौध्दकालीन नाण्यांचा उल्लेख करतात.रॉयल
एशियाटिक सोसायटीच्या एका नियतकालिकात असा उल्लेख आहे. बिजयसेन, ३ रा दामजदश्री, २
रा रूद्रसेन, विश्‍वसिंह, भर्तृदामन व विश्‍वसेन या महाक्षत्रपांची नाणी कऱ्हाडास सापडली
आहेत. त्यांचा काळ इसवी सन २५० पासून ते इसबी सन ३०४ हा आहे. दाभोळ दरबाजालगतच्या भिंतीत
एका सुंदर खरीची प्रतिमा कोरलेला एक दगड़ अर्धवट दिसत असे. त्याचा काळ इसवी सनाच्या
६ बे शतक हा असावा.

Thanks for reading Viral Varta.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top