Chitpavan Brahmins Maharashtra Karad

 Chitpavan Brahmins Maharashtra, Karad : 

    शेवटी १५ ऑगस्ट १९४७
रोजी भारत स्वतंत्र झाला. सर्वत्र मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा झाला. कऱ्हाडमध्येही
काँग्रेस पक्षातर्फे एक मोठी प्रभात फेरी या निमित्ताने निघाली होती. शिवाय कऱ्हाड
शहर काँग्रेस कमिटीतर्फे कऱ्हाड विषयक ऐतिहासिक प्रदर्शनही सुधाताई स्मारक मंदिशत
(टिळक हायस्कूल समोर) भरबले होते. या कामी बाबुराव गोखले आणि बिभूते पेंटर इत्यादींनी
विशेष परिश्रम घेतले होते.  ता. ३० जानेबारी
१९४८ रोजी एक भयंकर घटना घडली. महात्मा गांधींचा खून झाला. संपूर्ण राष्ट्राला धक्का
बसला. ठिकठिकाणी शोकसभा झाल्या. सातारा जिल्ह्यात इतर पवित्र स्थळांबरोबरच कऱ्हाड येथील
प्रीतिसंगमात गांधीजींच्या रक्षेचा अंश विसर्जित झाला. त्या पाठोपाठ या जिल्ह्यात जळिताचे
सत्र सुरू झाले.

    महात्मा गांधींचा
खुनी ब्राह्मण होता म्हणून खुनाचा बदला घेण्यासाठी ब्राह्मणांविरुद्ध कायदा हाती घेतला
पाहिजे अशी या चळवळ्यांची धारणा होती. ३१ जानेवारी १९४८ रोजी जुन्या स्टँडवर झालेल्या
शोकसभेत हाच सूर होता. कऱ्हाडातील रा. स्व. संघाचे केळकर वकील, हिंदूमहासभेचे शंकरराब
जोशी (कॅश केमिस्ट), बुधकर बकील, नथुराम गोडसेचे नातेवाईक गणपतराव फडके यांना लक्ष्य
करून काहींनी आखणी केली. सबंध जिल्ह्यात जाळपोळ, खून व अत्याचार यांचे सत्र सुरू झाले.
मात्र कऱ्हाड आणि त्याच्या आसपासच्या भागात कसलेही अत्याचार घडले नाहीत. याचे श्रेय
यशबंतराब चव्हाण, गणपतराब आळतेकर, बाबुराब गोखले, विष्णुमास्तर निगडीकर ब माधवराब जाधब
यांच्याकडे जाते.

    महाराष्ट्रात तरी
निदान कऱ्हाड हे अपवाद ठरले असावे. नंतर कऱ्हाडभोवतीच्या ग्रामीण भागातील ब्राम्हणवर्ग
प्रामुख्याने कऱ्हाडातच स्थायिक झाला.  गोमांतकाच्या
स्वातंत्र्याची चळवळ महाराष्ट्रातूनच प्रामुख्याने चालवली जात होती. सत्याग्रहींचे
जथेच्या जथे गोमांतकात इ. स. १९५४ पासून जात होते. मे १९५५ मध्ये ज्ञानदेव कराळे, जून
१९५५ मध्ये काल्याचे राजाराम पाटील ब भाई आत्माराम पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील
आपापल्या तुकड्यांसह गोव्यात प्रवेश केला. भाई चितळ्यांच्या मोर्चामध्ये देखील सातारा
जिल्ह्यातील सुमारे १५० लोक होते. त्यांच्याच प्रेरणेने दि. १० जून १९५५ रोजी पोर्तुगीज
दडपशाहीला न जुमानता ज्या पाच सत्याग्रहींनी पणजीतील पोर्तुगीज सचिबालयाबर तिरंगा फडकबला.
त्यापैकी रघुनाथराव चव्हाण हे एक होत.

    दि. १५-८-१९५७ रोजी
कऱ्हाडचे नाथ चव्हाण यांनी बांदा आघाडीवर गोळीबारास तोंड दिले तर श्रीनिवास लहड यांना
पोलीसांनी पकडून मारहाण करुन जंगलात फेकून दिले त्या अगोदर नगरहवेली मुक्‍त करण्यासाठी
महाराष्ट्रातून एक तुकडी मोठ्या धाडसाने तेथे गेली होती. त्यामध्ये कऱ्हाडजवळील रेठरे
येथील सदुभाऊ पाटील आपल्या दहा साथीदारांसह गेले होते. दि. १५ ऑगस्ट १९५५ ला पुणे येथे
जे झेंडावंदन झाले. त्याचे प्रमुख पाहुणे होते कऱ्हाडचे बाबुराव गोखले. गोवा मुक्तीसाठी
पराक्रम करावा असे त्यांनी आवाहन केले. या शिवाय कऱ्हाड शहरातील गोवे सत्याग्रही पुढीलप्रमाणे
होते. कृष्णराब गोविंदराव चव्हाण, रामचंद्र मलू कदम, सीताराम पांडुरंग देशमुख, शामराव
बंडू वाडकर, बादशहा अली मुल्ला, हालू उर्फ हसन कासम नदाफ, शंकर एकनाथ धावडे, हुसेन
गुलाब मुजावर, ज्ञानदेव केशव देसाई, रामचंद्र कृष्णा शिंदे, दिनकर वाघमारे, लक्ष्मण
हरी गिजरे, शिवराम उर्फ पंजाबराब नाईकजी चव्हाण.

     शिवछत्रपतींच्या जयंतीची आणि टिळक पुण्यतिथीची सुटी
राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस म्हणून द्यावी ही महाराष्ट्राच्या लोकमानसातील भावना कऱ्हाडचे
आमदार व्यंकटराव पवार यांनी तत्कालीन मुंबई राज्य विधानसभेत प्रश्‍न विचारून व्यक्त
केली, त्याचप्रमाणे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा हा मराठी जनतेचा आबाजही १९४८
मध्ये बिधानसभेत बिनसरकारी ठराव मांडून पबारांनीच प्रथम उठबिला होता. १९५३ मध्ये कऱ्हाडच्याच
आमदार यशबंतराब मोहिते यांनी विधानसभेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या बिनसरकारी
ठरावाने त्याच मागणीचा पुनरुच्चार केला होता.

    १९५६ मध्ये राज्यपुनर्सचना
विधेयकाबाबत लोकसभेत नेमलेल्या प्रवरसमितीच्या अहवालात त्या समितीचे एक सभासद कऱ्हाडचे
गणपतराव आळतेकर यांनी भिन्न मतपत्रिका जोडून मुंबईला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याचा
किंबा ते शहर केंद्रशासित करण्याचा बिचार करण्याचे कारण नाही मुंबई शहर महाराष्ट्रातच
राहणे न्याय्य आणि लोकशाही तत्त्वास सुसंगत ठरेल असे ठामपणे नोंदविले होते.  इ. स. १९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा
सर्व महाराष्ट्रभर जोर होता. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व पालिका काँग्रेस पक्षाच्या
हातातून निसटून समितीच्या ताब्यात गेल्या होत्या. त्यामुळे या काळात कऱ्हाड नगरपरिषदेत
देखील बरीच घालमेल होत होती.

    दि. २२-१०-१९५५ च्या
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी राज्य पुनर्रचना
समितीने नाकारल्याबद्दल खेद व्यक्त करुन ती मागणी पुन्हा आग्रहाने करणारा ठरव करण्यात
आला. दि. ७-८-१९५९ रोजी नगरपालिकेचे सभासद सर्वश्री बुधकर, मुळे, शेख ब मुतबल्ली यांनी
नगरपरिषदेच्या खास बोलावलेल्या सभेत मुंबई- म्हैसूर सीमाबादाचा प्रश्‍न मुख्यमंत्री
ना. यशबंतराव चव्हाण शांततेने ब सनदशीरपणे सोडवत आहेत म्हणून त्यांना पाठिंबा व व त्यांच्यावरील
विश्वास व्यक्त करणारा ठराव मांडला व तो मंजूर झाला. 

    इ. स. १९६२ मधील भारत-चीन
युद्धानंतर कऱ्हाडचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी देशाच्या संरक्षणपदाची सूत्रे हाती
घेतली. इ. स. १९६५ पर्यंत संरक्षणदलाची संपूर्ण पुनर्रचना त्यांनी केली. त्यामुळेच
इ. स. १९६५ मधील पाकिस्तानाविरुद्धचा विजय सहज मिळवता आला. इ. स. १९७५ मध्ये तत्कालीन
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी आणली ब ब्यक्लिस्वातंत्र्याची चहुकडून
मुस्कटदाबी केली. मिसा नावाच्या अन्याय्य कायद्याखाली अनेकांना तुरुंगवास घडवून आणला.
त्यावेळी कऱ्हाडचे संघचालक नानासाहेब बुधकर व बिपिनराव पेंढारकर, रामभाऊ गिजरे, नारायणराव
ढवळीकर हे संघाचे स्वयंसेवक एकोणीस महिने तुरुंगात होते. 

    इ. स. १९९७ हे बर्षे
भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सबी वर्ष होते. त्यानिमित्त १४ ऑगस्टला रात्री संपूर्ण
कऱ्हाडमध्ये पन्नास मशालीसह एक प्रचंड फेरी निघाली होती. संपूर्ण आकाश या प्रकाशाने
उजळून निघाले होते. या फेरीत सर्व स्तरांतील सुमारे पंचवीस हजार लोक सामील झाले होते.
बरोबर रात्री बारा वाजता तत्कालीन जिल्हाधिकारी वंदना खुल्लर यांच्या हस्ते ध्वजारोहण
ब ध्वजबंदन झाले.  लोकशाहीत कायदेमंडळात प्रतिनिधित्य
करणे हे फार महत्त्वाचे काम आहे. मुंबईच्या बिधानपरिषदेबर लक्ष्मण महादेव ऊर्फ नानासाहेब
देशपांडे (१९२६-३०), त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागी भीमराव नागोजीराव ऊर्फ
भाऊसाहेब पाटणकर तर महाराष्ट्र विधान परिषदेत संभाजीराव मारुतराव थोरात (१९५८-७०),
पांडुरंग दादासाहेब पाटील (१९६०-६३), भास्करराब ज्ञानोबा शिंदे , जयबंतराब कृष्णशब
भोसले (१९८० – ८२) यांनी प्रतिनिधित्व केले.

     मुंबई राज्य विधानसभेवर दक्षिण सातारा मतदारसंघातून
आत्माराम पाटील ( काँग्रेस), पांडुरंग केशव शिराळकर (काँग्रेस), आण्णाप्पा नारायण कल्याणी
(स्वतंत्र) आणि शंकरराव पांडुरंग मोहिते (स्वतंत्र) हे चौघे १९३७ मध्ये निवडून गेले,
पैकी शंकरराव मोहिते यांनी महसूल खात्यात नोकरी स्वीकारल्याने राजीनामा दिला. त्या
जागी चंद्रोजीराब पाटील ( काँग्रेस) निवडून आले होते. १९३७ मध्ये मुस्लिम मतदार संघातून
अहमद कासम कच्छी यांची निवड झाली होती. १९४५ मध्ये झालेल्या निबडणुकीत यशवंतराव बळबंतराव
चव्हाण, पुरुषोत्तम पांडुंग गोखले, व्यंकटराव पिराजीराब पबार आणि के. डी. पाटील हे
चारही काँग्रेसचे उमेदबार निवडून गेले. या वेळी मुस्लिम मतदारसंघातून दादामिया सय्यद
यांची निवड झाली होती. याच काळात उत्तर सातारा मतदारसंघातून गौरीहर एकनाथ सिंहासने
(काँग्रेस) निवडून आले होते. मुंबईत व नंतरच्या महाराष्ट्र विधानसभेवर उत्तर कऱ्हाड
मतदारसंघातून यशबंतराब बळबंतराब चव्हाण (१९५२-६२), पांडुरंग दादासाहेब पाटील (१९६३-६७,
१९८०-८५, १९९५-९९) यशबंतराब बाबुराव पाटील (आबा पार्लेकर) (१९६७-७२) बाबुराव रामचंद्र
कोतवाल (१९७२-७७), जनार्दन बाळकृष्ण ऊर्फ शामराव अष्टेकर (१९८५-९५) आणि शामराब पांडुरंग
ऊर्फ बाळासाहेब पाटील (१९९९ पासून) (हे सर्व काँग्रेस/राष्ट्रवादी काँग्रेसचे) निवडून
आले. १९७७-८० या काळात शे. का. पक्षाचे केशवराब पाटलोजी पबार यांची निबड झाली होती.  कऱ्हाड दक्षिण मतदार संघातून यशवंतराव जिजाबा मोहिते
(शे. का. पक्ष १९५२-६१, नंतर काँग्रेस ९६१ ते १९७७) तर विलासराव बाळकृष्ण पाटील (काँग्रेस)
१९७७ पासून सातत्याने निबडून येत आहेत.

    पाटणमधून दौलतराव
श्रीपतराव ऊर्फ बाळासाहेब देसाई (काँग्रेस) (१९५२ पासून) तर धोंडीराम शिदोजीराब ऊर्फ
दादासाहेब जगताप (काँग्रेस) सातारा मतदार संघातून (१९६१ पासून) निवडून बेत होते.  कऱ्हाडातून निवडून गेलेल्या यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब
देसाई, दादासाहेब जगताप, यशवंतराव मोहिते, विलासराव उंडाळकर आणि शामराव अष्टेकर बांची
मंत्रिपदीदेखील निबड झाली होती. बिधान परिषदेचे अनेक वर्षे सभापती असलेले वि. स. पागे
हेही कऱ्हाडचेच.  मध्यवर्ती काबदेमंडळावर १९२३
मध्ये सरदार मुतालिक निवडून आले होते. लोकसभेवर कऱ्हाड मतदारसंघातून दाजी रामचंद्र
ऊर्फ आनंदराब चव्हाण प्रथम शे.का. पक्षातर्फे ब पुढे काँग्रेस पक्षातर्फे (१९५२-७३),
प्रेमलाताई चव्हाण ( काँग्रे), (१९७३-७७, १९८४- १९९१), यशवंतराव मोहिते (काँग्रे) १९७७
– ८४ , पृथ्वीराज दाजी चव्हाण (काँग्रेस) १९९६-२००० आणि २००० पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे
श्रीनिवास दाजी पाटील निबडून आले. सातारा मतदारसंघातून काँग्रेसचे व्यंकटराव पिराजीराव
पवार ( १९५२-५७) यांनी प्रतिनिधित्व केले होते.

    यशवंतराव चव्हाण १९६२
मध्ये प्रथम नाशिक मतदारसंघातून आणि त्यानंतर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून
गेले. १९४५ मध्ये मूळचे कऱ्हाडचे पण नंतर उत्तर प्रदेशात स्थायिक झालेले बाबा राघबदास
( राघवेंद्र शेषो पाच्छापूरकर ) काँग्रेसतर्फे उत्तर प्रदेश बिधान सभेत निबडून आले
होते तर तारा गोबिंदराब सप्रे या ( स. गो. बर्वे यांच्या भगिनी व कऱ्हाडच्या स्नुषा)
बर्वे यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी काँग्रेसतर्फे निवडून गेल्या होत्या. आनंदराव
चव्हाण, यशवंतराव चव्हाण केंद्रीय मंत्रिमंडळात होते. आणि पृथ्वीराज चव्हाण सध्या राज्यमंत्री
आहेत. प्रेमलाताई चव्हाण (१९८२-८४) राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. पृथ्वीराज चव्हाण
२००० पासून राज्यसभेवर आहेत.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top