प्राचीन काळ (Karad )
आज ज्याला कऱ्हाड–कराड असे म्हणतात त्याचे जुने उल्लेख करहकट, करहाकडक, करहाडक, करहाटक, करहाट, करहाड व करहड अशा नावांनी ताप्रपटांत, शिलालेखांत व महाभारतात सापडतात. मात्र कऱ्हाडचा लेखी
स्वरूपातील सर्वांत प्राचीन उल्लेख महाभारताच्या सभापर्वातील ३२ व्या अध्यायात पांडवांपैकी एक असलेल्या सहदेवाच्या संदर्भात आहे.
तिमिड्गलं च स नृपं वशे कृत्वा महामति:
एकपदांश्च पुरुषान्केरलानन्वनवासिन:
नगरीं संजयन्तीं च पाषण्डं करहाकटम्
दूतैरैव वशे चक्रे करं चैनानदापयत
अर्थ – (त्या बुध्दिमान सहदेवाने) (ताम्रद्वीपाचा राजा) तिमिड्ंगल यास वश करून एकपाद, केरल, वनवासी (वनवासी प्रांतात राहणारे) हे लोक नगरी संजयन्ती व ज्यात पाखण्डवादी लोक आहेत असे करहाकट (कऱ्हाड) ही
(आपल्या) दूतांकडूनच ताब्यात आणिली व त्याजकडून कर वसूल केला. कऱ्हाड हे पाखंडवादी म्हणजे प्रस्थापित वैदिक धर्माविरुद्धचे बौद्ध व जैन लोक असावेत. महाभारतकाळ जरी इ. स. पूर्व ४ थे सहल्लक असला तरी त्या
महान ग्रंथाचा लेखनकाळ बराच अलीकडचा म्हणजे इ. स. पू. ३०० ते ४०० असा मानतात. कऱ्हाडच्या दक्षिणेकडील आगाशिवाच्या डोंगरात हीनयान पंथीयांची लेणी याला साक्ष देतात. कऱ्हाडचा बौद्धपूर्व वृत्तांत मात्र निश्चित सांगता येत नाही. कारण तसे पुरावे सापडले नाहीत. मात्र इ. स. १९४८–४९ मध्ये पुणे येथील भारत इतिहास संशोधन मंडळाने जे उत्खनन केले. त्यावरून ब इ. स. १९६५ ते १९६८ च्या सुमारास कऱ्हाडच्या पंतांच्या
कोटात भुयारी गटार योजनेसाठी जे खोदकाम केले
त्यावेळी जे अवशेष सापडले त्यावरून कर््हाडचे प्राचीनत्व बरेच मागे म्हणजे शातवाहन
काळाच्या मागे आपल्याला नेता येते. महाभारतात
व पुराणात एवढेच नव्हे तर पुढील काळातील धार्मिक वाड्मयातदेखील कृष्णानदीचा उल्लेख
कृष्णा-वेण्णा किंवा कृष्णा-वेणी असा होतो. या बाबतीत वि. का. राजवाडे असा खुलासा करतात
की, प्राचीन पुराणात उल्लेखित वेन राजाच्या वंशातील वेन जमातीची वसाहत कृष्णा नदीच्या
परिसरात प्रथम झाली असावी ते कृष्ण म्हणजे कृषिकर्म करणारे लोक असावेत.
प्राचीन काळातील ज्या शजवर्टीच्या राज्यांचा विस्तार
आपणास माहित आहे, त्यावरून असे दिसते की इ.स.पू. ७ वे ते ३ रे शतक या काळात राष््रिकांचे
राज्य कऱ्हाडवर असावे. या राष्ट्रिकांवरूनच आपल्या प्रांताला महाराष्ट्र असे नाव मिळाले.
राष्ट्रिक-रट्टी-महारट्टी -मराठी असा हा प्रवास आहे. त्यानंतर आले ते मौर्यांचे, जवळ-जवळ
संपूर्ण भारतावर असणारे साम्राज्य. इ.स.पू. ३२२ ते इ. स.पू. १८५ या काळातीलअशोकाच्या
साम्राज्याच्या सीमा तर आपणास माहीत आहेत. मात्र कऱ्हाडवरील या दोघांही राजवर्टींचा
प्रत्यक्ष पुरावा नाही.
त्याचप्रमाणे शातवाहन किंवा आंफश्रभृत्यांचे राज्यदेखील कऱ्हाडवर असावे. नंतरच्या
काळात होऊन गेलेल्या विजयसेन, दामजमदश्री, दुसरा रुद्रसेन, विश्वसिंह, भार्तृदामन व
विश्वसेन क्षत्रपांची नाणी मात्र कऱ्हाडजवळील गोवारे गावी व खुद्द कऱ्हाडमध्ये टिळक
हायस्कूलच्या बाजूस सापडली होती. त्यांची राजवट बहुधा इ.स. २८० ते ३०४ पर्यंत असावी.
यानंतर वाकाटक किंवा भोज यांचे राज्य. नंतर आली चालुक्याची राजबट. (इ. स. ५५० ते ७५३).
या राजांपैकी माधववर्मा नावाच्या राजाच्या ताम्रपटात रेट्टररक (रेठरे), बेलवाटिका (बेलवडे), कोलिकावाटिका (कोळे) आणि वट्टरिका (वाठार) या कऱ्हाडजवळील वाड्यांचा उल्लेख आहे. दरम्यान कुंतलराजांनी पण तेथे अंमल गाजवला असावा. कारण आजचे कुंडल हे त्या नावाचाच अपभ्रंश असावा. माधववर्मा हा कदाचित चालुक््यांचा मांडलिकही असावा. त्यानंतरचे राष्ट्रकूट हे मात्र कऱ्हाडवर नक्कीच राज्य करत होते. कारण या घराण्यातील दुसरा दन्तिदुर्ग या राजाने इ. स. ७५३ साली दिलेल्या ताम्रपटात करहाटक असा उल्लेख आहे. याच घराण्यातील तिसऱ्या गोविंदाने व्यासभट्ट नावाच्या एका ब्राह्मणाला देणगी दिली.
त्या देणगीचा जो ताम्रपट आहे. त्यात या ब्राह्मणाचे राहण्याचे गाव करहड असे दिले आहे.
या दानपत्राची तारीख आहे २३ एप्रिल ८१०. कऱ्हाडच्या ब्राह्मणांना कऱ्हाडे ब्राह्मण
ही उपाधी याच काळात मिळाली असण्याची शक्यता आहे.
याच राष्ट्रकूट घराण्यातील तिसरा कृष्णराज याने एक ताम्रपट दिला आहे. त्यात
कऱ्हाडचे नाव करहाट असे दिले आहे. या ताम्रपटात कऱ्हाड हा विषय म्हणजे जिल्हा असल्याचे
नमूद केले आहे. याची तारीख आहे ९ मार्च ९५९. ही देणगी एका तपश्चरण करणाऱ्या ईशानशिवाचा
विद्यार्थी गगनशिव याला दिली आहे. यानंतर कऱ्हाडवरील
सिंद् या राजवटीचा थोडासा पुरावा मिळतो. सिंद् मूळ सिंध प्रांतातून आले असावेत. त्यांच्या
एकूण तीन शाखा होत्या. त्यांतील एका शाखेचा उल्लेख इ. स. ११६५ च्या हरिहरच्या लेखात
आला आहे. ह्या सिंदाच्या एका पूर्वजास करहाट प्रांत त्याचे वास्तव्याचे ठिकाण होणार
आहे असे सांगितल्यावर तो तेथे गेला. तेथील मूळच्या राजास या सिंदाने हाकलून दिले व
४००० गावे व शहरे असलेल्या करहाट प्रांतावर त्याने राज्य केले. हे सिंद शिलाहारांच्या
पूर्वीचे असावेत. शिंदे या आडनावाचा या सिंदांशी संबंध असावा.
इसवी सनाच्या ११ व्या व १२ व्या शतकात कऱ्हाड, वाळवे व कोल्हापूर या प्रांतांवर शिलाहारांचा अंमल होता. दक्षिण महाराष्ट्रातील अनेक बुलंद दगडी किल्ल्यांच्या बांधकामाचे श्रेय शिलाहारांकडे जाते. कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावर असलेला भुईकोट किल्ला कदाचित यांनीच बांधला असावा. इ. स. १०५८ या वर्षांत मारसिंह या शिलाहार राजाने एक ताप्रपट दिला होता. त्यात कऱ्हाडचा उल्लेख करहाट असा आहे. हा प्रांत त्याच्या ताब्यात होता. त्याच्या मुलीचे नाव चंद्रलेखा असे असून तिचा विवाह पश्चिम चालुक्य राजा शककर्ता सम्राट सहावा विक्रमादित्य याच्याबरोबर झाला. हा विवाहसोहळा करहाटास म्हणजे कऱ्हाडात झाला. याचे रसभरित वर्णन काश्मिरी पंडित कवी विद्यापती बिल्हण याच्या *विक्रमांकदेवचरित्रा*तील ८ व्या व ९ व्या सर्गांत आले आहे. हा विवाह फार मोठ्या राजाचा होता. त्याचा लवाजमादेखील तसाच मोठा असणार. तेव्हा लग्नाचे स्थळही त्याच योग्यतेचे असले पाहिजे.
याचाच अर्थ कऱ्हाड हे त्या काळी फार भरभराटीचे व महत्त्वाचे शहर असले पाहिजे. “राजतरंगिणी* ग्रंथातही अध्याय ७ (इ.स. ११२४) मध्ये कऱ्हाडची राजकन्या चंद्रलेखा हिचा उल्लेख आहे. या शिलाहारांच्या शाखेतील सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे बिजयादित्य हा होय. इ. स. ११४२ ते ११५४ या काळातील त्याचे लेख प्रसिद्ध आहेत. हा राजा मोठा लक्ष्मीभक्त होता व कऱ्हाड त्याच्या राज्याची सरहद्द असावी म्हणून कऱ्हाडलादेखील त्याने एक अतिशय भव्य लक्ष्मीमंदिर बांधले. त्याचा दगडी चौथरा आजही निमजग्याच्या माळावर दिसतो. या देवळातील लक्ष्मीची मूर्ती कनकआभा म्हणजे सुवर्णतेजाची असून सोळा हातांची होती.
या मंदिशत अनेक कोनाडे असून त्यात अनेक देवतांच्या मूर्ती होत्या. त्यातील एक म्हणजे कऱ्हाडच्या सोमवार पेठेतील भैरोबा गल्लीतील उत्तरालक्ष्मीची मूर्ती. ही मूर्ती इतकी सुंदर आहे की त्यावरून मूळची लक्ष्मीची मूर्ती किती भव्य ब सुरेख असेल याची कल्पनाच केलेली बरी. इ. स. ११२९ मध्ये उभारलेल्या एका स्तंभलेखावरून समजते की सामन्तभट्र् नावाच्या एक जैन पंडिताने श्रवणबेळगोळ येथील स्तंभ उभारून झाल्यावर अनेक देशांचे परिभ्रमण केले व नंतर तो ‘बहुभट, विद्योत्कट व संकट‘ म्हणजे मोठमोठे पंडित ब पुष्कळ योद्धे असलेल्या करहाट नगरीत वादासाठी येऊन पोहोचला.
विजयादित्याचा पुत्र दुसरा भोज किंवा वीर भोज देव याचा २५ डिसेंबर ११९० चा एक शिलालेख आहे. त्यात या राजाने कऱ्हाडच्या आदित्यभट, लक्ष्मीधरभट्ट व प्रभाकर घैसास या कऱ्हाडे ब्राह्मणांस एक शेत, घर व उमामहेश्वराची मती पूजेसाठी दिल्याचा उल्लेख आहे.
कऱ्हाडे ब्राह्मण मूळचे कोण होते याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. पण त्यांचा कोकणातील विस्तार प्रामुख्याने शिलाहारांच्या काळातच झाला. शिलाहार घराण्यातील दुसऱ्या भोजाची सत्ता इतकी वाढली की तो आपणास पश्चिम चक्रवर्ती म्हणून म्हणवून घेऊ लागला. पण नंतर मात्र यादव काळातील सम्राट सिंघण याने हा मुलूख आपल्या साम्राज्यात सामील करून घेतला. हे शिलाहार राजे नंतरच्या काळात विजयनगरच्या राजाचे मांडलिक झाले असावेत. कारण नंतरच्या या काळात त्यांचे अस्तित्व दाखवणारे पुरावे उपलब्ध झाले नाहीत.
Thanks For reading Viral Varta information about Karad city in Marathi language.