Yashwantrao Chavan Marathi Mahiti
1962 साली भारत चीन युद्धानंतर कराडचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी देशाच्या संरक्षण पदाची सूत्रे हाती घेतली आणि इसवीसन 1965 पर्यंत संरक्षण दलाची पूर्णपणे पुनर्रचना करण्यात आली त्यामुळेच 1965 सालच्या पाकिस्तान युद्ध दरम्यान भारताने अगदी सहजपणे पाकिस्तानचा पराभव केला.
यशवंतरावांच्या उल्लेखाशिवाय कराडचा इतिहास पूर्ण होणार नाही. एका गरीब घरामध्ये जन्माला येऊन यशवंतराव यांनी कर्तृत्वाची अनेक शिखरे गाठली. यशवंतरावांनी सायमन कमिशन वरील बहिष्कार करून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. असहकार आंदोलन करताना त्यांनी 18 महिन्यांचा तुरुंगवास भोगला.
इसवी सन 1942 साली झालेल्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्याचे नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांनी केले. यानंतर कायदेमंडळामध्ये निवडून येऊन ते पार्लमेंट मध्ये सेक्रेटरी बनले. पुढे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री भारताचे संरक्षण मंत्री अर्थमंत्री व उपपंतप्रधान ही पदे त्यांनी भूषवली.
महाराष्ट्र मध्ये पंचायती राज आणि साखर कारखानदारी आणून त्यांनी महाराष्ट्राचा चेहरा मोठा बदलला.
आपल्या मृदू व संस्कारी स्वभावाच्या जोरावर त्यांनी राजकारण व समाजकारणामध्ये मानाचे स्थान मिळवले अशा या कराडच्या पुत्राचा कराडकर यांना अतिशय स्वाभिमान आहे.
कराड मधील राजकारण:
यशवंतराव चव्हाणांनी १६ मे १९६१ रोजी त्या वेळेच्या नगरपालिकेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रातील इच्छेस अनुसरून भुईकोट किल्ला व नदी यांच्यामधील ‘स्वामीची बाग‘ या नावाने ओळखली जाणारी सुमारे साडेसात
एकर जमीन नगरपरिषदेने संपादित केली. त्या जागेत बाग तयार करण्यात आली होती. पण ६ जून १९७६ रोजी आलेल्या महापुराने ती बाग अक्षरश: वाहुन गेली. त्यानंतर पुण्याचे गार्डन आर्किटेक्ट जयंत धारप यांच्याकडून करून घेतलेल्या त्या आराखड्यानुसार नागमोडी सस्ते, छोट्या उंचीची बिविध झाडे, प्रशस्त हिरवळ, फुलांचे मनोहारी ताटवे, प्रवेशद्वाराजवळच लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारांची अत्याधुनिक खेळणी, या पद्धतीने हे उद्यान विकसित करण्यात आले. कोयना नदीपलीकडे असलेल्या सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या उपसा जलसिंचन योजनेतून नदीत पाईप लाईन टाकून उद्यानासाठी पाणी आणले असून प्रशस्त हिरवळ टबटवीत वण्यासाठी ठिकठिकाणी स्त्रिंकलर्स बसविले आहेत. उद्यानात ध्वनिमुद्रित सुमधुर संगीत प्रसारण यंत्रणा ब शोभिवंत कारंजे हे उपक्रम यशवंतराव चव्हाणांच्या समाधिस्थळाचे पावित्र्य कमी होते म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यामुळे २२–५–२००६ पासून बंद होते. नुकतीच ही बंदी उठविली आहे. या शिवाय सोमवार पेठेत बालाजी मंदिरासमोर सदुभाऊ पेंढारकर पुतळ्यामागे नाना – नानी पार्क, शिवाजी हौसिंग सोसायटीत व स्मशानभूमीलगत नगरपरिषदेचे बगीचे आहेत.
कराडचा इतिहास:
महाभारतात व पुराणात एवढेच नव्हे तर पुढील काळातील धार्मिक वाड्मयातदेखील कृष्णानदीचा उल्लेख कृष्णा–वेण्णा किंवा कृष्णा–वेणी असा होतो. या बाबतीत वि. का. राजवाडे असा खुलासा करतात की, प्राचीन पुराणात उल्लेखित वेन राजाच्या वंशातील वेन जमातीची वसाहत कृष्णा नदीच्या परिसरात प्रथम झाली असावी ते कृष्ण म्हणजे कृषिकर्म करणारे लोक असावेत. प्राचीन काळातील ज्या राजवर्टींच्या राज्यांचा विस्तार आपणास माहित आहे, त्यावरून असे दिसते की इ.स.पू. ७ वे ते ३ रे शतक या काळात राष््रिकांचे राज्य कऱ्हाडवर असावे. या राष्ट्रिकांवरूनच आपल्या प्रांताला महाराष्ट्र असे नाव मिळाले. राष्ट्रिक–रट्टी–महारट्टी –मराठी असा हा वास आहे. त्यानंतर आले ते मौर्यांचे, जवळ–जवळ संपूर्ण भारतावर असणारे साम्राज्य. इ.स.पू. ३२२ ते इ. स.पू. १८५ या काळातीलअशोकाच्या साम्राज्याच्या सीमा तर आपणास माहीत आहेत. मात्र कऱ्हाडवरील या दोघांही राजवर्टींचा प्रत्यक्ष पुरावा नाही. त्याचप्रमाणे शातवाहन किंवा आंध्रभूत्यांचे राज्यदेखील कऱ्हाडवर असावे. नंतरच्या काळात होऊन गेलेल्या विजयसेन, दामजमदश्री, दुसरा रुद्रसेन, विश्वसिंह, भार्तृदामन व विश्वसेन क्षत्रपांची नाणी मात्र कऱ्हाडजवळील गोवारे गावी व खुद्द कऱ्हाडमध्ये टिळक हायस्कूलच्या बाजूस सापडली होती. त्यांची राजवट बहुधा इ.स. २८० ते ३०४ पर्यंत असावी. यानंतर वाकाटक किंवा भोज यांचे राज्य. नंतर आली चालुक्याची राजबट. (इ. स. ५५० ते ७५३). या राजांपैकी माधववर्मा नावाच्या राजाच्या ताम्रपटात रेट्टरक (रेठरे),
बेलवाटिका (बेलवडे), कोलिकावाटिका (कोळे) आणि वट्टरिका (वाठार) या कऱ्हाडजवळील वाड्यांचा उल्लेख आहे. दरम्यान कुंतलराजांनी पण तेथे अंमल गाजवला असावा. कारण आजचे कुंडल हे त्या नाबाचाच अपश्रंश असावा. माधववर्मा हा कदाचित चालुक्यांचा मांडलिकही असावा.
राष्ट्रकूट घराण्यातील तिसरा कृष्णराज याने एक ताम्रपट दिला आहे. त्यात कऱ्हाडचे नाव करहाट असे दिले आहे. या ताम्रपटात कऱ्हाड हा विषय म्हणजे जिल्हा असल्याचे नमूद केले आहे. याची तारीख आहे ९ मार्च ९५९. ही देणगी एका तपश्चरण करणाऱ्या ईशानशिवाचा विद्यार्थी गगनशिव याला दिली आहे. यानंतर कऱ्हाडवरील सिंद् या राजवटीचा थोडासा पुरावा मिळतो. सिंद् मूळ सिंध प्रांतातून आले असावेत. त्यांच्या एकूण तीन शाखा होत्या. त्यांतील एका शाखेचा उल्लेख इ. स. ११६५ च्या हरिहरच्या लेखात आला आहे. ह्या सिंदाच्या एका पूर्वजास करहाट प्रांत त्याचे वास्तव्याचे ठिकाण होणार आहे असे सांगितल्यावर तो तेथे गेला. तेथील मूळच्या राजास या सिंदाने हाकलून दिले व ४००० गावे व शहरे असलेल्या करहाट प्रांतावर त्याने राज्य केले. हे सिंद शिलाहारांच्या पूर्वीचे असावेत. शिंदे या आडनावाचा या सिंदांशी संबंध असावा.
इसवी सनाच्या ११ व्या व १२ व्या शतकात कऱ्हाड, वाळवे व कोल्हापूर या प्रांतांवर शिलाहारांचा अंमल होता. दक्षिण महाराष्ट्रातील अनेक बुलंद दगडी किल्ल्यांच्या बांधकामाचे श्रेय शिलाहारांकडे जाते. कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावर असलेला भुईकोट किल्ला कदाचित यांनीच बांधला असावा. इ. स. १०५८ या वर्षांत मारसिंह या शिलाहार राजाने एक ताप्रपट दिला होता. त्यात कऱ्हाडचा उल्लेख करहाट असा आहे. हा प्रांत त्याच्या ताब्यात होता. त्याच्या मुलीचे नाव चंद्रलेखा असे असून तिचा विवाह पश्चिम चालुक्य राजा शककर्ता सप्राट सहावा विक्रमादित्य याच्याबरोबर झाला. हा विवाहसोहळा करहाटास म्हणजे कऱ्हाडात झाला. याचे रसभरित वर्णन काश्मिरी पंडित कवी विद्यापती बिल्हण याच्या “विक्रमांकदेवचरित्रा*तील ८ व्या व ९ व्या सर्गांत आले आहे. हा विवाह फार मोठ्या राजाचा होता. त्याचा लवाजमादेखील तसाच मोठा असणार. तेव्हा लग्नाचे स्थळही त्याच योग्यतेचे असले पाहिजे.
याचाच अर्थ कऱ्हाड हे त्या काळी फार भरभराटीचे व महत्त्वाचे शहर असले पाहिजे.
“राजतरंगिणी* ग्रंथातही अध्याय ७ (इ.स. ११२४)
मध्ये कऱ्हाडची राजकन्या चंद्रलेखा हिचा उल्लेख आहे.
या शिलाहारांच्या शाखेतील सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे बिजयादित्य हा होय. इ. स. ११४२ ते ११५४ या काळातील त्याचे लेख प्रसिद्ध आहेत. हा राजा मोठा लक्ष्मीभक्त होता व कऱ्हाड त्याच्या राज्याची सरहद्द असावी म्हणून कऱ्हाडलादेखील त्याने एक अतिशय भव्य लक्ष्मीमंदिर बांधले. त्याचा दगडी चौथरा आजही निमजग्याच्या माळावर दिसतो. या देवळातील लक्ष्मीची मूर्ती कनकआभा म्हणजे सुवर्णतेजाची असून सोळा हातांची होती. या मंदिशत अनेक कोनाडे असून त्यात अनेक देवतांच्या मूर्ती होत्या. त्यातील एक म्हणजे कऱ्हाडच्या सोमवार पेठेतील भैरोबा गल्लीतील उत्तरालक्ष्मीची मूर्ती. ही मूर्ती इतकी सुंदर आहे की त्यावरून मूळची लक्ष्मीची मूर्ती किती भव्य ब सुरेख असेल याची कल्पनाच केलेली बरी.
इ. स. ११२९ मध्ये उभारलेल्या एका स्तंभलेखावरून समजते की सामन्तभट्र नावाच्या एक जैन पंडिताने श्रवणबेळगोळ येथील स्तंभ उभारून झाल्यावर अनेक देशांचे परिभ्रमण केले व नंतर तो “बहुभट, द्योत्कट व संकट‘ म्हणजे मोठमोठे पंडित ब पुष्कळ योद्धे असलेल्या कऱहाट नगरीत वादासाठी येऊन पोहोचला. विजयादित्याचा पुत्र दुसरा भोज किंवा वीर भोज देव याचा २५ डिसेंबर ११९० चा एक शिलालेख आहे. त्यात या राजाने कऱ्हाडच्या आदित्यभट, लक्ष्मीधरभट्ट व प्रभाकर घैसास या कऱ्हाडे ब्राह्मणांस एक शेत, घर व उमामहेश्वराची मूर्ती पूजेसाठी दिल्याचा उल्लेख आहे.
Thanks for reading our artical at viral varta, we are trying to give you information from rural maharashtra to help you the real facts, Please keep reading viralvarta.com