Karad History In Marathi

Karad_Viral_Varta

  1. Karad Urban Bank
  2. Karad City Population
  3. Karad City History in Marathi
  4. Karad Taluka Village List
  5. Karad to Pune distance
  6. Karad Pin Code
  7. Karad Taluka Information in Marathi

Karad City History In Marathi :    

     मित्रांनो
कराड शहरामध्ये कोयना नदीवरचा पूल 1974 साली बांधण्यात आला होता आणि त्यानंतर राष्ट्रीय
महामार्ग चौपदरी करण्याच्या योजनेमध्ये या पुलाचे सुद्धा विस्तारीकरण करण्यात आले.
जुना कोयना पूल सध्या पादचारी मार्ग म्हणून वापरला जातो. मित्रांनो आपण आज ज्याला कराड
शहर म्हणून ओळखतो या शहराचा इतिहासामध्ये उल्लेख कराड, कऱ्हाड, कर्हाट, करहाटक, करहाडक  अशा अनेक नावांनी अनेक ताम्रपटांमध्ये सापडतो. महाभारताच्या
सभापर्वतील ३२ व्या श्लोकामध्ये पांडवांपैकी एक असणारा सहदेव याने , कर्हाटक आपल्या
ताब्यात घेऊन या भागातून कर वसूल केल्याचे वर्णन आहे. इसवी सन 1965 ते 68 च्या दरम्यान
कराडमध्ये भुयारी गटारासाठी खोदकाम चालू असताना जे अवशेष सापडले त्यानुसार कराडचे सातवाहनांच्या
काळातील असणारे प्रकजिनत्व सिद्ध झाले आहे.

Karad City History During Yadav Kingdom : 

    महाराष्ट्रामध्ये यादवांची राजवट असताना यादव
राजा रामदेवराय याच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याचे आक्रमण
झाले होते. यामध्ये यादव सत्तेचा पराभव झाला. मुस्लिम राजवटी दरम्यान कराडला कलहराबाद
किंवा कलहाट असे संबोधले जायचे. इसवी सन १३९६ ते १४०८ या दरम्यान कराडमध्ये मोठा दुष्काळ
पडला होता, ज्याला दुर्गादेवीचा किंवा दुर्गाडीचा दुष्काळ म्हणून संबोधले जाते.

भोसले घराण्याची संबंधित असणाऱ्या काही घटना
कराडमध्ये घडल्या होत्या त्या पुढील प्रमाणे आहेत: (Key points about Bhosale Family in Karad City History)

       शिवाजी
महाराजांचे  आजोबा मालोजी व मालोजींचे मेव्हणे
राव वनंगपाळ नाईक निंबाळकर यांनी निजामशाहीच्या बाजूने असताना, आदिलशाहीमध्ये बंडाळी
माजवली व या दोघांनी 1596 मध्ये कराडचा भुईकोट किल्ला व पन्हाळा किल्ला जिंकून घेतला
होता. याच पराक्रमामुळे माजी, मालोजीराव झाले. १६३७ मध्ये आदिलशाही मधील मातब्बर सरदार
शहाजीराजांना बादशहाकडून कराड प्रांतातील २२ गावांची जहागिरी मिळाली होती. पुढे शहाजीराजांनी
आदिलशाही सोडल्यावर हा प्रांत झुंजारराव घाडगे यांना मोकासा देण्यात आला. त्यानंतर
आदिलशाहीतील बडी साहेबीण व शेवटी १६५३ मध्ये घोरपडे यांच्या अधिपत्याखाली हा प्रदेश
आला होता.

Karad City History during era of Shivaji Maharaj     

    शिवरायांच्या
काळामध्ये १६६१ साली स्वतः आदिलशहा दुसरा आली शिवरायांसोबत लढण्यासाठी कराडमध्ये आला
होता व ही लढाई कराडच्या ईदगा माळावर झाली होती. याच काळातील आणखी एक महत्त्वाची गंमत
म्हणजे शिवरायांनी १६५९ साली अफजलखानाचा वध केला या वधा नंतर अफजलखानाचा मुलगा फाजल
याला व याच्या बायकांना माघारी सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी खंडोजी धर्मजी काकडे
यांने पैशाच्या लालसेपोटी घेतली होती. हाच खंडोजी काकडे शिवाजी महाराजांच्या भीतीने
कराडच्या जुम्मा मशिदीमध्ये महिनाभर लपून बसला होता. मराठेशाही सुरू झाल्यावर कराडचे
अनेक संदर्भ आपल्याला दिसून येतात.

       शिवरायांच्या मृत्यू वेळी असणारे स्वराज्याचे
सरसेनापती हंबीरराव मोहिते, हे कराड जवळच्या तळबीडचे होते तसेच त्यांची मुलगी रणरागिनी
ताराराणी या सुद्धा तळबीडमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या.

History of Pantpratinidhi at Karad City : 

       छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य
रक्षणासाठी अनेक मराठा सरदार व प्रतिनिधींनी आपले बुद्धी चातुर्य वापरले. त्यातील एक
महत्त्वाचे नाव म्हणजे परशुराम त्र्यंबक कुलकर्णी हे होते. सुरुवातीला परशुराम पंत
हे आमात्यांच्या सेवक होते व पुढे ते सरदार बनले. स्वराज्यामध्ये दुफळी मजल्यावर ते
ताराराणीच्या पक्षामध्ये होते. १७०७ मध्ये शाहू महाराज कैदेतून आल्यावर शाहू महाराजांनी
परशुरामांना आपल्या बाजूने केले व पंतप्रतिनिधी हे पद दिले तसेच कराडचा प्रांत प्रतिनिधींकडे
दिला.  27 मे 1718 रोजी परशुराम पंतांचे निधन
झाले व त्यांचे पुत्र श्रीनिवास परशुराम हे प्रतिनिधी बनले.

वारणेचा तह : 

       1730
साली कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजांसोबत पंतप्रतिनिधींनी युद्ध केले कोल्हापूरचे
संभाजी राजे छत्रपती यांचा पराभव झाला. 28 फेब्रुवारी 1731 रोजी कराड जवळच्या जखीणवाडी
मध्ये सातारा व कोल्हापूरच्या छत्रपतींची भेट होऊन दोन्ही राज्यांच्या सीमा निश्चित
करणारा वारणेचा तह झाला. या तहानंतर वारणेच्या उत्तरे कडचा भाग सातारकरांकडे तर दक्षिणेकडचा
भाग कोल्हापूर राजगादीकडे गेला आणि कराड प्रांताचा कारभार श्रीपतराव पंत प्रतिनिधींकडे
गेला. या प्रतिनिधींनी आपली राजधानी कराडमध्ये भुईकोट किल्ल्यामध्ये नेली आणि शेजारचे
वसंतगड सदाशिवगड मच्छिंद्रगड हे किल्ले ताब्यात ठेवून रक्षणाची सोय केली.

थोटे पंतांचा इतिहास:

       प्रतिनिधींची राजधानी कराड असल्यामुळे मुख्य
सैन्याचा तळ कराडमध्ये असायचा. श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांचे 25 नोव्हेंबर 1746 रोजी
निधन झाल्यावर जगज्जीवनराव, त्र्यंबकराव आणि भावानराव हे वंशपरंपरेने प्रतिनिधी पदावर
आले. यातील भवनरावांचा 30 ऑगस्ट 1777 रोजी मृत्यू झाला आणि त्याच दिवशी त्यांचा मुलगा
जन्माला आला ज्याचे नाव परशुराम असे ठेवण्यात आले होते. नाना फडणवीस आणि भवनरावांचे
स्नेह असल्यामुळे फडणवीस यांनी परशुराम पंतांची मुंज असेल किंवा त्यांचे लग्न असेल
ते पुढाकार घेऊन लावले. परशुराम पंतांचा खर्डाच्या लढाईमध्ये लढताना उजवा हात तुटला
म्हणून त्यांना थोटेपंत असे म्हणायचे. थोटेपंत अतिशय अवलिया होते 1806 मध्ये काही वादामुळे
दुसऱ्या बाजीरावाने तोटे पंतांचा मुलुख जप्त करून थोटे पंतांना 1811 पर्यंत पुण्यामध्ये
ठेवले होते.

         १०
फेब्रुवारी 1818 मध्ये पेशवाई संपली तेव्हा सातारचे रेसिडेंट असणारे इंग्रज अधिकारी
ग्रँड साहेबांनी तहनामा करून थोटे पंतांचा दर्जा व मर्तबा त्यांना पुन्हा देऊ केला.
थोटे पंतांना पुत्र नव्हता व दत्तक घ्यायची त्यांची इच्छा सुद्धा नव्हती, पण ग्रांड
साहेब व थोटेपंतांच्या संबंधितांनी मारून मुटकटून दत्तक पुत्र त्यांच्या मांडीवर बसवला
ज्याचे नाव श्रीनिवास असे होते.

श्रीनिवास पंतप्रतिनिधी :    

     18 मार्च 1847 मृत्यू झाला व प्रतिनिधीपत श्रीनिवास
पंतप्रतिनिधी या प्रत्येक पुत्राला मिळाले आहे 1855 मध्ये कराड प्रांत इंग्रजांच्या
अधिपत्याखाली आला त्यामुळे श्रीनिवास पंतप्रतिनिधींनी आपली राजधानी औंध या ठिकाणी हलवली.
इंग्रजांनी कराडच्या बदल्यामध्ये 72 खेडी युवकाही वाड्या 5०० चौरस मैलाचा प्रदेश दिला
ज्याचे वार्षिक उत्पन्न फक्त चार ते पाच लाख इतकेच होते आणि हा प्रदेश व खेडे अशी होती
की पहिल्या खेड्याचा कर वसूल करून प्रतिनिधी दुसऱ्या गावाला पोहोचेपर्यंत पहिल्या वसुलीची
बाकी शून्य होत असे.

 पंतप्रतिनिधींनी राजधानी हलवली होती तरीसुद्धा कराडचा
भुईकोट किल्ला त्यांच्याच ताब्यामध्ये होतं या ठिकाणी भवानी देवीचे मंदिर होते, ज्या
ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी प्रतीनिधी दरवर्षी जात असेल 1897 साली देवीने
असा कौल दिला की “औं धाला देवी आणून उत्सव साजरा करावा” त्यामुळे भुईकोट
किल्ल्यातील देवी या ठिकाणी स्थापित करण्यात आली. मित्रांनो पेशव्यांच्या अस्ताबरोबर
१८१८ साली मराठा स्वराज्य लयाला गेले असे समजले जात असले तरी सातारची राजगादी 16 मे
1849 रोजी खालसा करण्यात आली आणि तेव्हा खऱ्या अर्थाने मराठी सत्तेचा शेवट झाला असे
म्हणू शकतो.

सातारच्या राजगादीचा रणसंग्राम : History Of Satara and Chh. Pratapsinh Bhosale:

       ही राजगादी
खालसा करू नये यासाठी सातारचे प्रताप सिंह यांनी खूप अटीतटीचे प्रयत्न केले पण त्याचा
काही सुद्धा उपयोग झाला नाही. महाराजांचे प्रतिनिधी 14 वर्षे इंग्लंडला राहून जीवाचे
रान करत होते. अनेक पत्रव्यवहार इंग्रजांसोबत करण्यात आले, पण त्याचा काही सुद्धा फायदा
झाला नाही आणि त्यामुळेच त्यांची प्रजासत्ता इंग्रजांच्या पेटून उठली ५ सप्टेंबर
1839 रोजी इंग्रजांनी प्रतापसिंहांना पदच्युत केले.

       जेव्हा इंग्रजांनी प्रतापसिहांना पदच्युत केले
तेव्हा कराड जवळच्या खोळे येथील धारराव पवार यांनी सगळ्यात पहिले बंड केले. प्रतापसिंहाचे
कारभारी रंगो बापूजी यांनी सैन्य भरती सुरू केली. त्यांच्या सैन्य भरतीमध्ये धारराव
पवार यांनी महत्त्वाची कामगिरी केली. तसेच रंगो बापूजी यांच्या अनुयायांमध्ये असणारे
दौलता हरिबा पवार यांनी उठावासाठी 400 सैनिक कराड मधून तयार करून दिले. त्यांच्या
34 प्रमुख अनुयायी पैकी 17 जण कंपनी सरकारच्या हाती लागले व त्यांना अटक करून ठेवण्यात
आले दौलता हरिबा पवार हे मात्र कधीच ब्रिटिशांच्या हाती लागले नाहीत. याच उठावा दरम्यान
रामचंद्र गोपाळ जोशी यांनी सातारच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.
हा उठाव यशस्वी झाला नाही म्हणून रामचंद्र जोशी माघारी घरी परतलेच नाहीत. अलिबाग येथील
कनकेश्वराच्या मंदिरामध्ये संन्यासी लंबोदरआनंद या नावाने रामचंद्र जोशी यांनी आपले
आयुष्य व्यतीत केले.

भारतामध्ये राष्ट्रवादाची सुरुवात:      

    सुशिक्षित झालेल्या भारतीय समाज सुधारकांनी
अनेक प्रकारे लोकजागृती व समाज सुधारणा करून, एका नव्या मार्गाने वाटचाल करायला सुरुवात
केली. हा मार्ग होता राष्ट्रवादी तर दुसरा मार्ग क्रांतिकारी विचारांचा होता. ब्रिटिश
लोकांच्या परिचयामुळे व संबंधामुळेच राष्ट्रवाद भारतामध्ये राष्ट्रवाद अस्तित्वात आला
असे म्हणायला हरकत नाही. क्रांतिकारी मार्गाने हिंसेचा वापर करून इंग्रजांना घालवणे
व लोकजागृती करून लोकमतच्या ताकदीवर अनेक वेगवेगळ्या चळवळी उभा करायच्या, सभा परिषदा
आणि बहिष्कारच्या मार्गाने परकीय सत्तेवर दडपण आणण्याचे काम राष्ट्रवादी विचाराचे लोक
करत होते.

मुळशी सत्याग्रह: Mulshi Satyagraha :       

    मुळशी
तालुक्यातील मुळशी धरण बांधताना तसेच कोयना धरण बांधताना अनेक सत्याग्रह झाले ही धरणे
बांधल्यामुळे अनेक गावे उठणार होती आणि शेतकऱ्यांची बाजू घेत सरकारच्या विरोधात नेते
उभे होते ब्रिटिश सरकारने त्यावेळच्या शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच लांबवले, नेते यासाठी
वारंवार उठाव करत राहिले. ही धरणे बांधून पूर्ण झाली, उठाव करणाऱ्या पिढ्या संपल्या
पण विस्थापितांचे प्रश्न अजूनही तसेच आहेत. या सर्व चळवळींमध्ये कराडच्या नेत्यांनी
सक्रिय सहभाग नोंदवला होता.

       मित्रांनो
कराड प्रांत राष्ट्रवादी व क्रांतिकारी या दोन्ही विचारांच्या नेत्यांनी परिपूर्ण होता.
कराडमध्ये १८८८ साली  काँग्रेसची स्थापना झाली
होती तर राष्ट्रीय संघाचे काम 1928 मध्ये कराड प्रांत मध्ये सुरू झाले.

       धन्यवाद
मित्रांनो भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत वाचत राहा व्हायरल
वार्ता.

Thanks for reading Viral Varta!!


 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top