पालखी मार्ग कधी पूर्ण होणार ? Palkhi Marg Project 2024 | Alandi – Pandharpur

 

मित्रांनो, पंढरपूर हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
असे मानले जाते की भगवान विष्णूंनी पांडुरंग रूपात येथे दर्शन दिले होते.
पांडुरंग भगवान येथे २८ युगांपासून विटेवर उभे राहून भक्तांचे भक्तीपूर्वक स्वागत करत आहेत.
या पावन स्थळी वर्षातून चार वेळा भव्य धार्मिक सोहळे आयोजित केले जातात.
या सोहळ्यांना महाराष्ट्रभरातून वारकरी प्रेमाने उपस्थित राहतात.
जुलै महिन्यातील पालखी यात्रा विशेष प्रसिद्ध असून भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
ही यात्रा पुण्यातील आळंदी येथून सुरू होऊन पंढरपूरमध्ये संपन्न होते.
यात्रेसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत:
१) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग
२) संत तुकाराम महाराज पालखी मार्ग

दोन्ही मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
या दोन्ही मार्गांवर सध्या चौपदरी महामार्गाचे काम सुरू आहे.
महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी एक अतिरिक्त लेन फक्त पालखीसाठी तयार केली जात आहे.
हा प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून ओळखला जातो.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची लांबी २२४ किलोमीटर असून तो दिवेघाट ते मोफळ पर्यंत आहे.
या मार्गावर सासवड, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि शेवटी पंढरपूर येते.
या मार्गावर सात बायपास तयार केले जात असून अंदाजे खर्च ₹६७०० कोटी रुपये आहे.
या मार्गाचा महामार्ग क्रमांक NH-965 आहे.
या सुविधायुक्त मार्गामुळे वारकऱ्यांना प्रवासात अत्यंत सुलभता मिळणार आहे.
या मार्गावर १२ विश्रांतीस्थळे निर्माण केली जात आहेत, जिथे वारकरी विश्रांती घेऊ शकतात.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग १३५ किलोमीटर लांबीचा आहे.
या मार्गाचा महामार्ग क्रमांक NH-65 आहे.
हा महामार्ग पाटस वरून तोंडले पर्यंत चालतो.
यासाठी ₹४४०० कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे.
हा मार्ग बारामती, अकलूज, श्रीपुर आणि बोरगावमार्गे जातो.
या मार्गावर एकूण पाच बायपास तयार करण्यात येणार आहेत.
या मार्गावर ११ विश्रांतीस्थळे असणार असून यात्रेकरू येथे विश्रांती घेऊ शकतात.
मित्रांनो, हा केवळ महामार्ग नसून भक्तांच्या विठू माऊलीच्या दर्शनाचा मार्ग आहे.
गेल्या महिन्यात नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला असून काही महिन्यांतच मार्ग भक्तांसाठी खुले होणार आहे.

मित्रांनो, तुम्ही वाचत आहात वायरल वार्ता.
वायरल वार्ता या यूट्यूब चॅनलवर आम्ही या विषयांवरचे ताजे अपडेट्स नियमितपणे आणत असतो.
तर हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.

धन्यवाद!

Viral Varta is our best news blog for lates updates, keep searching viral varta!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top