Nira Narsingpur Temple History in Marathi
Nira Narsingpur Temple History in Marathi निरा नरसिंहपुर या ठिकाणी नीरा व भीमा नदीचा संगम होतो. या ठिकाणाला भौगोलिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. या क्षेत्राला त्रिवेणी संगमाचे ठिकाण तसेच दक्षिणेतील प्रयागराज असे संबोधले जाते. या ठिकाणी श्री लक्ष्मी नरसिंहाचे मंदिर आहे. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी भजन केल्याचे, तसेच एकनाथ व नामदेव महाराज येऊन गेल्याचे पुरावे इतिहासामध्ये सापडतात. महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे कुलदैवत आहे. येथील मंदिर एखाद्या राजवाड्याप्रमाणे दिसते. या मंदिराचा जिर्णोद्धार 16 व्या आणि 17 व्या शतकामध्ये करण्यात आला होता हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे. येथील मूळ मंदिर इसवी सनाच्या आठव्या शतकामध्ये बांधले होते. नरसिंह मंदिरामध्ये भक्त प्रल्हाद व नरसिंहाची मूर्ती आहे. वैशाख महिन्यामध्ये नरसिंह जयंती उत्सव या ठिकाणी दहा दिवसांसाठी होतो. या उत्सवा दरम्यान दोन ते तीन लाख भाविक या मंदिराला भेट देतात. संत तुकारामांनी या नदीच्या संगमाला त्रिवेणी संग म्हणून उल्लेख केला आहे. त्रिवेणी म्हणजे तीन नद्यांचा संगम. पहिली नदी भीमा, दुसरी निरा, आणि तिसरी म्हणजे गुप्तगंगा नदी होय. राणी कायाधुने भक्त प्रल्हादाला या संगमाच्या ठिकाणी जन्म दिला. हिरण्यकश्यप हा भक्त प्रल्हादाचा पिता व कायाधू राणीचा नवरा होता. हिरण्यकश्यपुणे घोर तपश्चर्या करून देवाकडून असा वर मागून घेतला की, मला दिवसा किंवा रात्री, घरामध्ये किंवा घराबाहेर, मनुष्य किंवा प्राणी मारू शकणार नाही. हा वर मिळाल्यानंतर हिरण्यकश्यपू स्वतःला सर्वात श्रेष्ठ मानू लागला. त्याने त्याच्या राज्यामध्ये देवाचे नाव घेण्यास बंदी घातली. जो कोणी या आदेशाचे पालन करणार नाही त्याला त्याने मृत्युदंड देण्याचा आदेश काढला. हिरण्यकश्यपूचा स्वतःचा मुलगा भक्त प्रल्हाद याने तो आदेश मोडला. आदेश मोडल्यामुळे हिरण्यकश्यपुणे भक्त प्रल्हादाला मृत्युदंड दिला. सगळ्यात प्रथम भक्त प्रल्हादाला उंच टेकडीवरून खाली टाकण्यात आले परंतु त्यावेळी देवाने भक्त प्रल्हादाला वाचवले. त्यानंतर भक्त प्रल्हादाला उकळलेल्या तेलाच्या कडे मध्ये टाकण्यात आले, यावेळीही भक्त प्रल्हादाला देवाने वाचवले. शेवटी नरसिंहाचा अवतार घेऊन विष्णु देवाने हिरण्यकश्यपूला सायंकाळच्या वेळी घराच्या उंबरठ्यावर मारले. यावेळी ना दिवस होताना रात्र होती ना माणसाने मारले ना प्राण्याने मारले. अशा प्रकारे दिवाने त्यांचे वचनही पाहिले आणि हिरण्यकश्यपूचा वध सुद्धा करण्यात आला. हेच आहे निरा नरसिंह महात्म्य. या मंदिराचा परिसर अतिशय शांत व रमणीय आहे. पेशव्यांच्या काळामध्ये या मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करण्यात आला होता. वारकरी संप्रदायाचा इतिहास आणि वारसा लाभलेले तसेच संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण नीरा नदीच्या देवत्वामध्ये महत्त्वाची भर घालते आणि याच ठिकाणी नीरा नदी भीमा नदीला मिळते. धन्यवाद! तुम्ही वाचत आहात वायरल वार्ता ज्या ठिकाणी आम्ही रोजच लेटेस्ट अपडेट घेऊन येतो तेव्हा वाचत रहा व्हायरल वार्ता! Viral Varta is our best […]