Karad
प्राचीन काळ (Karad ) आज ज्याला कऱ्हाड–कराड असे म्हणतात त्याचे जुने उल्लेख करहकट, करहाकडक, करहाडक, करहाटक, करहाट, करहाड व करहड […]
प्राचीन काळ (Karad ) आज ज्याला कऱ्हाड–कराड असे म्हणतात त्याचे जुने उल्लेख करहकट, करहाकडक, करहाडक, करहाटक, करहाट, करहाड व करहड […]
Koyana Dam Marathi Mahiti : 11 डिसेंबर 1967 रोजी पहाटे चार वाजून 31 मिनिटांनी सगळे दख्खनचे पठार हादरले.
Yashwantrao Chavan Marathi Mahiti 1962 साली भारत चीन युद्धानंतर कराडचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी देशाच्या संरक्षण पदाची सूत्रे हाती घेतली
Karad Urban Bank Karad City Population Karad City History in Marathi Karad Taluka Village List Karad to Pune distance Karad
शिखर शिंगणापूर हे देवस्थान कुठे आहे ? Where is Shikhar Shingnapur? हे शंभू महादेवाचे देवस्थान, महाराष्ट्रातील सातारा शहरापासून ६५ किलोमीटर
भीमा नदी मराठी माहिती (Bhima River Information In Marathi) : भीमा ही महाराष्ट्रातील चौथी सर्वात मोठी लांब नदी आहे. या नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी सह्याद्री रांगेमध्ये होतो. भीमाशंकर हे ठिकाण बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. भीमा नदीचे एकूण लांबी 860 किलोमीटर आहे. यापैकी 451 किलोमीटर अंतर ही नदी महाराष्ट्रातून वाहते.भीमा नदी आग्नेयेला सोलापूर जिल्ह्यातून वाहत जाऊन कर्नाटक मध्ये रायचूर जवळ कुरबुडे या ठिकाणी कृष्णा नदीला मिळते. इंद्रायणी, मुळा,मुठा,भामा,घोळ,कुकडी,सीना या भीमेच्या प्रमुख उपनद्या आहेत. भिमा नदीला चंद्रभागा का म्हणतात ? Why Bhima river
Nira Narsingpur Temple History in Marathi निरा नरसिंहपुर या ठिकाणी नीरा व भीमा नदीचा संगम होतो. या ठिकाणाला भौगोलिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. या क्षेत्राला त्रिवेणी संगमाचे ठिकाण तसेच दक्षिणेतील प्रयागराज असे संबोधले जाते. या ठिकाणी श्री लक्ष्मी नरसिंहाचे मंदिर आहे. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी भजन केल्याचे, तसेच एकनाथ व नामदेव महाराज येऊन गेल्याचे पुरावे इतिहासामध्ये सापडतात. महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे कुलदैवत आहे. येथील मंदिर एखाद्या राजवाड्याप्रमाणे दिसते. या मंदिराचा जिर्णोद्धार 16 व्या आणि 17 व्या शतकामध्ये करण्यात आला होता हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे. येथील मूळ मंदिर इसवी सनाच्या आठव्या शतकामध्ये बांधले होते. नरसिंह मंदिरामध्ये भक्त प्रल्हाद व नरसिंहाची मूर्ती आहे. वैशाख महिन्यामध्ये नरसिंह जयंती उत्सव या ठिकाणी दहा दिवसांसाठी होतो. या उत्सवा दरम्यान दोन ते तीन लाख भाविक या मंदिराला भेट देतात. संत तुकारामांनी या नदीच्या संगमाला त्रिवेणी संग म्हणून उल्लेख केला आहे. त्रिवेणी म्हणजे तीन नद्यांचा संगम. पहिली नदी भीमा, दुसरी निरा, आणि तिसरी म्हणजे गुप्तगंगा नदी होय. राणी कायाधुने भक्त प्रल्हादाला या संगमाच्या ठिकाणी जन्म दिला. हिरण्यकश्यप हा भक्त प्रल्हादाचा पिता व कायाधू राणीचा नवरा होता. हिरण्यकश्यपुणे घोर तपश्चर्या करून देवाकडून असा वर मागून घेतला की, मला दिवसा किंवा रात्री, घरामध्ये किंवा घराबाहेर, मनुष्य किंवा प्राणी मारू शकणार नाही. हा वर मिळाल्यानंतर हिरण्यकश्यपू स्वतःला सर्वात श्रेष्ठ मानू लागला. त्याने त्याच्या राज्यामध्ये देवाचे नाव घेण्यास बंदी घातली. जो कोणी या आदेशाचे पालन करणार नाही त्याला त्याने मृत्युदंड देण्याचा आदेश काढला. हिरण्यकश्यपूचा स्वतःचा मुलगा भक्त प्रल्हाद याने तो आदेश मोडला. आदेश मोडल्यामुळे हिरण्यकश्यपुणे भक्त प्रल्हादाला मृत्युदंड दिला. सगळ्यात प्रथम भक्त प्रल्हादाला उंच टेकडीवरून खाली टाकण्यात आले परंतु त्यावेळी देवाने भक्त प्रल्हादाला वाचवले. त्यानंतर भक्त प्रल्हादाला उकळलेल्या तेलाच्या कडे मध्ये टाकण्यात आले, यावेळीही भक्त प्रल्हादाला देवाने वाचवले. शेवटी नरसिंहाचा अवतार घेऊन विष्णु देवाने हिरण्यकश्यपूला सायंकाळच्या वेळी घराच्या उंबरठ्यावर मारले. यावेळी ना दिवस होताना रात्र होती ना माणसाने मारले ना प्राण्याने मारले. अशा प्रकारे दिवाने त्यांचे वचनही पाहिले आणि हिरण्यकश्यपूचा वध सुद्धा करण्यात आला. हेच आहे निरा नरसिंह महात्म्य. या मंदिराचा परिसर अतिशय शांत व रमणीय आहे. पेशव्यांच्या काळामध्ये या मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करण्यात आला होता. वारकरी संप्रदायाचा इतिहास आणि वारसा लाभलेले तसेच संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण नीरा नदीच्या देवत्वामध्ये महत्त्वाची भर घालते आणि याच ठिकाणी नीरा नदी भीमा नदीला मिळते. धन्यवाद! तुम्ही वाचत आहात वायरल वार्ता ज्या ठिकाणी आम्ही रोजच लेटेस्ट अपडेट घेऊन येतो तेव्हा वाचत रहा व्हायरल वार्ता! Viral Varta is our best
नीरा नदीवर खंडाळा तालुक्यातील शिरवळ वीर धरण बांधण्यात आले आहे. हे धरण खंडाळा शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर असून, ते पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. सातारा शहरापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या धरणचेकाम 1965 साली पूर्ण झाले. या धरणाची उंची 35.81 मीटर म्हणजेच 117 फूट इतकी आहे. तर लांबी 3629 मीटर म्हणजेच 119006 फूट इतकी आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 10.15 टी एम सी इतकी आहे. या धरणाचा उपयुक्त जलसाठा 9.39 टी एम सी इतका आहे. या पाण्याच्या सहाय्याने नऊ मेगा वॅट इतकी वीज निर्मिती करण्यात येते.या पाण्याचा जलसिंचनासाठी वापर करण्यात येतो. . जलसिंचनासाठी या धरणाला डावा आणि उजवा असे दोन कालवे आहेत, या दोन्ही कालव्यांचा वापर करून पुणे व सातारा या दोन्ही जिल्ह्यातील शेतजमिनी ओलिताखाली आल्या आहेत. नीरा नदीची उपनदी असलेल्या वेळवंटी नदीवर ब्रिटिशांनी भाटघर हे धरण बांधले होते. हे धरण व याच्या जवळचा परिसर अतिशय रमणीय असल्यामुळे या धरण परिसरामध्ये नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. भाटघर धरण पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरे या गावजवळ आहे. वेळवंटी नदीवरील हे धरण दगडी बांधकाम प्रकारातील असून याचे काम 1928 साली ब्रिटिश राजवटीमध्ये पूर्ण करण्यात आले होते. हे धरण एकदा भरले की भोर, खंडाळा, बारामती, इंदापूर, फलटण आणि सोलापूरच्या शेतीसाठी व वापरासाठी या धरणातील पाण्याचा वापर करण्यात येतो. या धरणाची उंची 190 फूट तर लांबी 5,331 फूट इतकी आहे. भाटघर धरणाची पाणी साठवण क्षमता 23.76 टीएमसी इतकी आहे. या धरणाला 81 दरवाजे आहेत, यातील 45 दरवाजे स्वयंचलित आहेत. एकूण जलसाठ्याचा विचार करता भाटघर धरणाचा महाराष्ट्रामध्ये 14 वा क्रमांक लागतो. या धरणाच्या पाण्यावर 16 मेगा वॅट इतकी वीज निर्मिती करण्यात येते. तसेच धरणातील पाण्याचा वापर जलसिंचनासाठी सुद्धा करण्यात येतो. हे धरण निसर्ग रम्य ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी अनेक बॉलीवूड व मराठी चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. पुणे शहरापासून जवळ असल्यामुळे पर्यटकांचा आवडता टुरिस्ट स्पॉट म्हणून ह्या धरणाची ख्याती आहे. धन्यवाद! तुम्ही वाचत आहात वायरल वार्ता ज्या ठिकाणी आम्ही रोजच लेटेस्ट अपडेट घेऊन येतो तेव्हा वाचत रहा व्हायरल वार्ता! Viral Varta is our best news blog for latest updates, keep searching viral
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये शिरगाव मध्ये निरबावी नावाचे पांडवकालीन कुंड आहे. या कुंडामध्ये नीरा नदीचा उगम होतो.
मित्रांनो पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. असे म्हटले जाते की भगवान विष्णूंनी, पांडुरंगाच्या रूपामध्ये पंढरपूर मध्ये दर्शन दिले